वीर एकलव्य शोध व बचाव पथकाचा गौरव..अकोला जिल्हाधिकारी कार्यालयाकडून सन्मान...
सय्यद शकिल/अकोट तालुका प्रतिनिधी...
अकोट तालुक्यातील सातपुड्याच्या पायथ्याशी वसलेल्या ग्राम पोपटखेड येथील आपत्ती व्यवस्थापनाच्या कामात धाडस,समर्पण आणि सेवाभावाची जिवंत उदाहरण ठरलेल्या वीर एकलव्य आपत्कालीन शोध व बचाव पथक पोपटखेड यांना जिल्हाधिकारी कार्यालय अकोला,जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून अधिकृत प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आलं आहे.मान्सून २०२५ दरम्यान विविध शोध व बचाव मोहिमा,कावड यात्रा बंदोबस्त,गणपती विसर्जन आणि आपत्कालीन घटनांमध्ये या पथकाने बजावलेली भूमिका खरोखरच प्रेरणादायी आहे.यावेळी आपत्कालीन बचाव पथकाचे प्रमुख पांडुरंग तायडे यांचा शाल,श्रीफळ,देऊन अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री आकाश फुंडकर,जिल्हाधिकारी वर्षा मीना, अकोला जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक,यांचे हस्ते पुरस्कार देण्यात आला.
