गजानन कोकाटे/पळशी सुपो...
बुलडाणा जिल्ह्यातील सातपुडयाच्या पायथ्याशी वसलेल्या जळगांव जामोद तालुक्यातील ' ब ' दर्जा प्राप्त तिर्थक्षेत्र पळशी सुपो येथे मानवरुपी कुत्रे खेळण्याचा उत्सव " कुत्रोत्सव " आज १ फेब्रुवारी रोजी संध्याकाळी सुपो संस्थानचे आवारात हजारो भाविकांच्या उपस्थितीत संपन्न झाला. ४०० वर्षाची परंपरा या उत्सवाला लाभली आहे.राज्य भरातून एकमेव पळशी येथे साजरा होणार हा कुत्रोत्सव हजारो भाविकांच्या उपस्थितीत दरवर्षी साजरा करण्यात येतो.कुत्रोत्सव म्हणजे 18 ते 35 वयोगटातील तरुण श्री समोर डफड्याच्या तालावर नाचत कोंडी फोडण्याचा प्रयत्न करतात . मंदिरा मध्ये 2 ते 3 क्विंटल प्रसादाचा घट मांडण्यात येतो.
श्री ची दैनदीन आरती होते तो पर्यंत बाहेर नाचत असलेल्या मानव रुपी कुत्र्यांना मंदिरात घुसू न देण्याची जबाबदारी कोंडीवर असलेल्या स्वयंसेवक यांची असते..त्यामुळे त्या दोघांमध्ये आत मध्ये घुसण्यासाठी जणू पारंपरिक युद्धच होते.. जवळपास एक तास त्यांची धडपड सुरू होते.. अवस्मरनिय असा हा सोहळा हाची देह हाची डोळा अनुभवण्यासाठी हजारो भाविक गुळाचा प्रसाद हातामधे घेवून उपस्थित होते .कोंडी फुटल्या नंतर आत मधील प्रसादाची लूट करण्यात आली. आणि यावेळी १० ते १५ क्विंटल गुळाचा प्रसाद भाविकानी वाटला... दि.३१ जानेवारी रोजी काठीचा मिरवणून काढण्यात आली.दोन्ही उत्सव अतिशय आनंदात व शांततेत पार पडला.. उत्सव यशस्वी पार पाडण्यासाठी गावातील नवयुवक, तथा श्री सुपो संस्थानं चे विश्वस्त, कर्मचारी,स्वयंसेवक आणि परिसरातील नागरिक यांनी परिश्रम घेतले.. सर्व भाविकांना संस्थान चे वतीने महाप्रसाद वाटप करण्यात आला..
