जळगाव जामोद (प्रतिनिधी):
जळगाव (जा.)तालुक्यामध्ये दिनांक १९ मार्चला अचानक झालेल्या वादळी वारा व पाऊस झाला त्यामुळे शेतकऱ्यांच्या तोंडाशी आलेले गहू,मका,ज्वारी,कांदा व इतर काही पिके जमीन दोस्त झाली.खरंतर सततची नापिकी व निसर्गाचा लहरीपणा या दुहेरी संकट यामुळे शेतकरी राजा दिवसेंदिवस चिंतेत आहेच मात्र पुन्हा पिकाची झालेले प्रचंड नुकसान यामुळे शेतकरी राजा हतबल झाल्याचे दिसून येत आहे.तरी शासनाने त्वरित शेतकऱ्याच्या पिकाचे पंचनामे करून भरीव नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी युवा आंदोलक अक्षय पाटील यांनी आज दिनांक २०/३/२०२६ तहसीलदार साहेब जळगाव जामोद यांना निवेदनाद्वारे केली.जर शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळाली नाही तर आंदोलन करण्यात येईल अशा इशारा सुद्धा देण्यात आला.यावेळी क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे शहराध्यक्ष अजय गिरी,युवा तालुकाध्यक्ष अमोल बहादरे,अनिलसिंह राजपूत, शिवदास खिरोळकर,त्रीलोकसिह राजपुत, सय्यद भाऊ,अमोल सोनोने,ज्ञानेश्वर खडारे,सागर गवई,सागर सपकाळ,तसेच मोठ्या शेतकरी उपस्थित होते.
