अकोट शहरात जंतुनाशक फवारणी व स्वच्छता मोहीम; नगरपालिका आरोग्य विभागाची प्रभावी कामगिरी...


अकोट शहरात जंतुनाशक फवारणी व स्वच्छता मोहीम; नगरपालिका आरोग्य विभागाची प्रभावी कामगिरी...

सय्यद शकिल/अकोट...

अकोट शहरातील नागरिकांचे आरोग्य सुरक्षित राखण्यासाठी अकोट नगरपालिका आरोग्य विभागामार्फत व्यापक स्वरूपात जंतुनाशक फवारणी व स्वच्छता मोहीम राबविण्यात येत आहे.ही मोहीम मा.आमदार प्रकाश भाऊ भारसाकळे तसेच मा.नगराध्यक्ष माया ताई धुळे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि मा.आरोग्य सभापती मनीष रामाभाऊ कराळे यांच्या आदेशानुसार प्रभावीपणे सुरू आहे.सध्या बदलत्या हवामानाच्या पार्श्वभूमीवर डेंग्यू,मलेरिया, चिकनगुनिया यांसारख्या साथीच्या आजारांचा धोका वाढण्याची शक्यता लक्षात घेऊन नगरपालिका प्रशासनाने आधीच खबरदारीचे उपाय हाती घेतले आहेत.शहरातील सर्व प्रमुख रस्ते,अंतर्गत गल्ल्या, नाले,कचरा साठवणुकीची ठिकाणे,तसेच संभाव्य संवेदनशील भागांमध्ये जंतुनाशक फवारणी नियमितपणे केली जात आहे.या मोहिमेमध्ये आरोग्य विभागातील अधिकारी व कर्मचारी सक्रिय सहभाग घेत असून त्यांना मा.मनीष कराळे यांच्या मार्फत वेळोवेळी मार्गदर्शक सूचना देण्यात येत आहेत.फवारणीसोबतच स्वच्छता,कचरा व्यवस्थापन आणि पाणी साचू न देणे यावरही विशेष भर दिला जात आहे.विशेष म्हणजे,आरोग्य सभापती मनीष रामाभाऊ कराळे यांच्या सक्रिय,दूरदर्शी आणि सक्षम धोरणांमुळे अशा प्रकारचे उपक्रम वेळोवेळी राबविले जात असून शहरातील आरोग्य व्यवस्थेत सातत्याने सुधारणा होत आहे.त्यांच्या नेतृत्वाखाली आरोग्य विभाग अधिक सजग आणि कार्यक्षम बनला असून नागरिकांच्या समस्या तात्काळ सोडविण्यावर भर दिला जात आहे.याशिवाय, नागरिकांमध्ये जनजागृती करण्यासाठीही विशेष मोहीम राबविण्यात येत आहे.घराभोवती स्वच्छता राखणे,पाणी साचू न देणे,कचरा योग्य ठिकाणी टाकणे याबाबत सूचना दिल्या जात आहेत.शाळा,सार्वजनिक ठिकाणे आणि बाजारपेठांमध्येही स्वच्छतेबाबत संदेश पोहोचविण्याचे काम सुरू आहे.नगरपालिका प्रशासनाने नागरिकांना आवाहन केले आहे की,स्वच्छता ही केवळ प्रशासनाची जबाबदारी नसून प्रत्येक नागरिकाचीही आहे. सर्वांनी सहकार्य केल्यास अकोट शहर स्वच्छ, निरोगी आणि रोगमुक्त ठेवणे शक्य होईल.अकोट शहरात राबविण्यात येणारी ही जंतुनाशक फवारणी व स्वच्छता मोहीम ही नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वपूर्ण ठरत असून प्रशासनाच्या या उपक्रमाचे सर्व स्तरांतून कौतुक केले जात आहे.

Previous Post Next Post