जनतेच्या तक्रारींचा ऑन दि स्पॉट निपटारा...केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी तक्रारी निकाली काढण्याचे दिले संबंधित अधिकाऱ्यांना निर्देश.!


 जनतेच्या तक्रारींचा ऑन दि स्पॉट निपटारा...केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी तक्रारी निकाली काढण्याचे दिले संबंधित अधिकाऱ्यांना निर्देश.!

बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी...

सर्व सामान्य जनतेच्या तक्रारीं तात्काळ निकाली काढून त्यांच्या समस्यांचे निराकरण करावेत असे निर्देश केंद्रीय आयुष, आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी आज अधिकाऱ्यांना दिलेत.नागरीकांच्या तक्रारी समस्याची तात्काळ  सोडवणूक  करण्यासाठी केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव व प्रशासकिय अधिकारी त्यांच्या उपस्थितीत  सातही विधानसभा मतदार संघ निहाय जनता दरबाराचे आयोजन करण्यात येणार आहे. या जनता दरबार कार्यक्रमाचा शुभारंभ आज राष्ट्रमाता जिजाऊंच्या जन्मभुमीतुन झाला   सिंदखेड राजा येथील मातोश्री मंगल कार्यालयात पहिला जनता दरबार आज घेण्यात आला होता  केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी राष्ट्रमाता जिजाऊंच्या प्रतिमेला पुष्पमाला अर्पण करून व दीप प्रज्वलन करून अभिवादन केले   यावेळी व्यासपीठावर माजी आमदार खेडेकर  अतिरिक्त जिल्हाधिकारी रमेश कव्हळे उपविभागीय अधिकारी प्रा संजय खडसे उपजिल्हाधिकारी श्री पोळ उपविभागीय  पोलीस अधिकारी  श्री ठोसरे सिदखेड राजाचे तहसिलदार अजित दिवटे देऊळगाव राजाचे तहसीलदार  वैशाली डोंगरजाळ शिवसेनेचे जिल्हाप्रमुख बळीराम मापारी शिवसेना महिला आघाडीच्या जिल्हाप्रमुख मायाताई म्हस्के नगराध्यक्ष सौरभ तायडे योगेश जाधव  यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी सदस्य  उपस्थित होते.कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच उपविभागीय अधिकारी प्रा संजय  खडसे यांनी जनता दरबार संदर्भात दाखल झालेल्या तक्रारी आणि कार्यक्रमाची रूपरेषा  प्रस्ताविकातून  सांगितली त्यानंतर  तक्रारदारांच्या समक्ष अधिकाऱ्यांसोबत तक्रारी संदर्भात चर्चा करण्यात आली व अधिकाऱ्यांना या तक्रारीवर तात्काळ कारवाई करून त्याचे निराकरण करण्याच्या सुचना यावेळी देण्यात आल्यात ... शेत रस्त्या अभावी शेतकऱ्यांच्या पेरण्या रखडणार नाही याची प्रशासनाने दखल घ्यावी ...  अधिकाऱ्यांनी सजक राहुन जनतेला सेवा प्रधान करावी .  तक्ररादार व्यक्तीला योग्य मार्गदर्शन करावे व समस्या तात्काळ निकाली काढाव्यात असे ही केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी या जनता दरबारात सांगितले या जनता दरबारमध्ये शेतरस्ते घरकुल , पाणी पुरवठा , महसुल , पोलीस , महिला व बाल कल्याण अधिकारी , विद्युत मंडळ ,नरेगा , कृषी , सह विविध विषया वरील  300  तक्रारी प्राप्त झाला होत्या  . या जनता दरबार मध्ये दाखल झालेल्या तक्रारींचं निराकरण आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांनी केलेली कारवाई या संदर्भात मंत्री महोदयांच्या जनसंपर्क कार्यालयातुन पुरावा करण्यात येणार आहे.

गैरहजर राहणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचे राज्यमंत्र्यांनी दिले निर्देश ...

 जनतेच्या तकरींचा तात्काळ निपटारा  करण्यासाठी सिदखेडराजा येथे आयोजित करण्यात आलेल्या जनता दरबारात गैरहजर राहणाऱ्या अधिकाऱ्यांवर  कारवाई करण्याचे निर्देश संबंधीत विभागाच्या वरिष्ठांना देण्यात आले आहेत .

Previous Post Next Post