जळगाव जामोद(प्रतिनिधी):
श्रीपाद कृष्ण कोल्हटकर महाविद्यालय, जळगाव जामोद येथे शैक्षणिक वर्ष २०२६–२७ मधील इयत्ता अकरावी कला व वाणिज्य शाखेच्या नवप्रवेशित विद्यार्थ्यांसाठी "प्रवेशोत्सव व अभिक्रमन (Induction Program)" मोठ्या उत्साहात आणि प्रेरणादायी वातावरणात पार पडला.कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती मातेच्या प्रतिमेचे पूजन, संत गाडगे महाराजांच्या प्रतिमेचे पूजन तसेच दीपप्रज्वलनाने करण्यात आली.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. गिरीश मायी होते. प्रमुख अतिथी म्हणून संस्थेचे सहसचिव मिलिंद जोशी, कनिष्ठ महाविद्यालयाचे पर्यवेक्षक प्रा. गोपाल वानखडे तसेच अधीक्षक संजय गाडेकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी प्रमुख मार्गदर्शन करताना सहसचिव मिलिंद जोशी यांनी विद्यार्थ्यांना उद्देशून सांगितले की, "महाविद्यालयीन जीवन हे व्यक्तिमत्त्व विकासाचे सुवर्णपर्व आहे. विद्यार्थ्यांनी मोठी स्वप्ने पाहून शिस्त, सातत्य, परिश्रम आणि सकारात्मक दृष्टिकोन यांच्या बळावर यशाचे शिखर गाठावे. ज्ञानासोबत संस्कार, कौशल्य आणि सामाजिक बांधिलकी जोपासणे ही काळाची गरज आहे."यानंतर अधीक्षक संजय गाडेकर यांनी महाविद्यालयातील शैक्षणिक उपक्रम, परीक्षा पद्धती आणि शिस्तीचे महत्त्व विद्यार्थ्यांना पटवून दिले. प्रा. राजीव देवकर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.अध्यक्षीय समारोपात प्राचार्य डॉ. गिरीश मायी यांनी महाविद्यालयातील विविध शैक्षणिक, क्रीडा, सांस्कृतिक तसेच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांची सविस्तर माहिती देत विद्यार्थ्यांना महाविद्यालयाच्या समृद्ध परंपरेचा अभिमान बाळगून यशस्वी वाटचाल करण्याचे आवाहन केले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक कनिष्ठ महाविद्यालयाचे पर्यवेक्षक प्रा. गोपाल वानखडे यांनी केले. त्यांनी प्रवेशोत्सवाच्या उद्देशाबाबत माहिती देत नवागत विद्यार्थ्यांचे मनःपूर्वक स्वागत केले.कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचालन प्रा. गणेश जोशी यांनी केले, तर आभार प्रदर्शन प्रा. रामेश्वर सायखेडे करण्यात आले.कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी प्रा. ऋषिकेश कांडलकर, प्रा. विनोद बावस्कर,प्रा.नीलिमा भोपळे, प्रा.शेगोकार, प्रा.सचिन उनटकाड,प्रा.विनय उमरकर, समाधान निलजे , गजानन वानखडे, बाबुराव चव्हाण व हर्षद धर्मे यांनी विशेष परिश्रम घेत सहकार्य केले.नवागत विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग, मान्यवरांचे प्रेरणादायी मार्गदर्शन आणि उत्साहपूर्ण वातावरणामुळे प्रवेशोत्सव कार्यक्रम संस्मरणीय ठरला.
