अर्जुन खिरोडकार/हिवरखेड (प्रतिनिधी);
खोटे व बनावट व्हिडिओ व फोटो काढून ते सोशल मीडियावर टाकून नगरपरिषदेची व सत्ताधारी गटाची बदनामी करण्याचा जणू काही ट्रेंडच हिवरखेडात सुरू असल्याचे पाणीपुरवठा सभापती अजिज खान यांनी केलेल्या एका स्टिंग ऑपरेशन वरून आता उघड झाले आहे. प्रभाग क्रमांक 8 मध्ये पाणीपुरवठा सुरू असताना पाण्याची प्रचंड नासाडी होत असून सदर पाणी नालीत कसे वाहत आहे हे दाखवणारा एक खोटा व बनावट व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला त्याची तात्काळ दखल घेत पाणीपुरवठा सभापती अजित खान जमीर खान यांनी आपल्या कर्मचाऱ्यांसह घटनास्थळ गाठले मात्र तिथे गेल्यावर वेगळाच प्रकार उघडकीस आला ज्या घरमालकाच्या खासगी नळ कनेक्शन मधून पाणी वाहत असल्याचा व्हिडिओ व्हायरल करण्यात आला त्या घर मालकाला बोलावण्यात आले घरमालकाने आमचे घर बंद असून आम्ही येथे राहत नाही असे सांगून आम्ही घेतलेले पाणीपुरवठ्याचे खासगी नळ कनेक्शन चा पाईप आमच्या घराच्या बाहेर असून तो बदमाश्या करून तोडण्यात येऊन त्याचा खोटा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केल्याचा थेट आरोपच पाणीपुरवठा सभापती यांच्या समोर घेतला पाणी पुरवठा सभापती अजिज खा यांनी देखील घटनास्थळाची पाहणी केली असता सदर नळ कनेक्शन खोळसरपणाने तोडून व्हिडिओ काढल्याचे निष्पन्न झाले. अजित खा यांनी सोशल मीडियावर पाण्याच्या नासाडीचा व्हिडिओ व्हायरल करणारे दोन्हीजन 8 महिन्यापूर्वी झालेल्या नगरपरिषद निवडणुकीमध्ये विरोधी गटाकडून उभे असून पराभूत झाले व याचा वचपा काढण्यासाठी नगरपरिषद व सत्ताधाऱ्यांची बदनामी करण्याच्या हेतूने हि बदमाशी केली असल्याचे सांगून त्यावर ॲक्शन घेत नगरपरिषदेमध्ये नगरपरिषद नगराध्यक्ष व मुख्याधिकारी यांना पत्र देऊन कार्यवाहीची मागणी केली आहे. हिवरखेड शहरातील कधी दूषित पाणी पुरवठ्यावरून,कधी बांधकामावरून तर कधी कुत्रे पकडण्यावरून व्हिडिओ बनवून ते सोशल मीडियावर टाकून सर्वसामान्य नागरिकांची दिशाभूल करणारे खोटे व बनावट तर नाहीत ना असा प्रश्न आता नागरिकांमध्ये उपस्थित झाला आहे.
