जिल्हा परिषद उच्च प्राथमिक मराठी शाळा गौलखेडा बाजार येथील शाळा व्यवस्थापन समिती गठीत;विश्वर चिठ्ठीने शंकर मांडवे अध्यक्ष तर उपाध्यक्ष पदी रंजना बेलसरे...


 जिल्हा परिषद उच्च प्राथमिक मराठी शाळा गौलखेडा बाजार येथील शाळा व्यवस्थापन समिती गठीत;विश्वर चिठ्ठीने शंकर मांडवे अध्यक्ष तर उपाध्यक्ष पदी रंजना बेलसरे...

राजु भास्करे/अमरावती जिल्हा प्रतिनिधी..

दर दोन ते तिन वर्षांनी प्रत्येक शाळेतील शाळा व्यवस्थापन समिती गठीत करण्यात येथे त्या प्रमाणे चिखलदरा तालुक्यातील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक मराठी शाळा गौलखेडा बाजार या शाळेत दि.१०/१०/२०२६ रोजी ठिक ९ वाजता पालक सभा घेण्यात आली आहे.या सभे मध्ये केंद्र प्रमुख सविता भास्करे यांनी पालक मंडळीना मार्गदर्शन केले. व समोर चे सुत्र संचालन शाळेतील शिक्षक राजेंद्र काळे सर व संजय बेठे सर यांच्या कडे सोपविण्यात आले.यामध्ये काळे सर यांनी शाळा व्यवस्थापन समिती गठीत करण्यापूर्वी पालक मंडळीना शासन निर्णय (जि.आर) वाचुन दाखविले.त्याच प्रमाणे शाळा व्यवस्थापन समितीची पुनर्रचना करण्यात आली आहे.शाळा व्यवस्थापन समिती मध्ये पहिले सदस्यांची निवड करण्यात आली नंतर निवडून आलेल्या सदस्यांनी    अध्यक्ष, उपाध्यक्ष यांची निवड ईश्वर चिठ्ठीने करण्यात यावी असे काळे सर यांना सांगितले.या मध्ये अध्यक्ष म्हणून शंकर मांडवे तर उपाध्यक्ष म्हणून रंजना बेलसरे यांची निवड झाली आहे.तसेच सदस्य म्हणून राजु भास्करे,दिपक चव्हाण, भाऊराव महल्ले, मंगेश केदार,नाशिर पठाण,मंजुषा मावस्कर,कल्पना मोरने, तृप्ती राजने,दिपाली मांडवे हे आहेत.विषेश शिक्षण तंज्ञ प्रतिनिधी म्हणून आकाश जयस्वाल यांची निवड करण्यात आली आहे.राजेंद्र काळे यांची विशेष शिक्षक प्रतिनिधी म्हणून तर संजय बेठे सर यांची सचिव पदी निवड करण्यात आली आहे.तसेच शाळेतील विद्यार्थी प्रतिनिधी म्हणून अर्थव मावस्कर तर खुशी भुसुमकर हे आहेत.ही शाळा व्यवस्थापन समिती  अनुराधा बेलसरे सरपंच, रमेश महल्ले यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली आहे.शाळा व्यवस्थापन समिती गठीत करण्याकरिता शाळेतील पालक वर्ग बहुसंख्येने उपस्थित होते.

Previous Post Next Post