बुलडाणा जिल्हा प्रतिनिधी...
बुलढाणा अर्बन परिवाराचे सर्वेसर्वा राधेश्याम चांडक यांच्या वाढदिवसानिमित्त बुलढाणा विधानसभा मतदारसंघाचे आमदार धर्मवीर संजय गायकवाड यांच्या सुविद्य पत्नी तथा बुलढाणा नगरपरिषदेच्या कर्तव्यदक्ष नगराध्यक्षा पुजाताई संजय गायकवाड तसेच युवानेते मृत्युंजय गायकवाड यांनी सदिच्छा भेट देऊन त्यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या...!यावेळी डॉ. सुकेश झंवर,कोमलताई झंवर यांच्यासह विविध सामाजिक व सार्वजनिक विषयांवर पुजाताई गायकवाड यांनी सविस्तर चर्चा केली. या भेटीदरम्यान उपस्थित मान्यवरांमध्ये आपुलकीचा संवादही घडून आला...!यावेळी बुलढाणा नगरपालिकेचे गटनेते मृत्युंजय गायकवाड, उपनगराध्यक्ष गजेंद्र दांदडे, शैलेश कुळकर्णी, ज्ञानेश्वर खांडवे पाटील यांच्यासह इतर मान्यवर नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.राधेश्याम चांडक यांना उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य आणि पुढील सामाजिक वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा देण्यात आल्या...!
