समाजवादी पक्षाच्या प्रदेश कार्यालयात सैय्यद नफीस यांचा सत्कार;अबू आसिम आझमी यांच्या हस्ते गौरव; संघटन बळकटीसह जनहिताच्या प्रश्नांवर चर्चा...


 समाजवादी पक्षाच्या प्रदेश कार्यालयात सैय्यद नफीस यांचा सत्कार;अबू आसिम आझमी यांच्या हस्ते गौरव; संघटन बळकटीसह जनहिताच्या प्रश्नांवर चर्चा...

आर सी २४ न्युज नेटवर्क:

समाजवादी पक्षाच्या महाराष्ट्र प्रदेश कार्यालयात मुंबई येथे जळगाव जामोद नगरपरिषद चे नगरसेवक, सभापती तथा समाजवादी पक्षाचे जिल्हाध्यक्ष सैय्यद नफीस सैय्यद शफी यांचा प्रदेशाध्यक्ष अबू आसिम आझमी यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी आझमी यांनी सैय्यद नफीस यांना शुभेच्छा देत त्यांच्या पुढील सामाजिक व संघटनात्मक कार्यासाठी सदिच्छा व्यक्त केल्या.सत्कार सोहळ्यादरम्यान समाजवादी पक्षाच्या संघटनात्मक वाटचालीसह विविध जनहिताच्या प्रश्नांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. पक्षाची संघटनात्मक बांधणी अधिक मजबूत करणे, कार्यकर्त्यांना सक्रियपणे पक्षाशी जोडणे तसेच सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नांना प्राधान्य देऊन ते प्रभावीपणे मांडण्याबाबत यावेळी विचारविनिमय झाला.

या कार्यक्रमास युवा जिल्हाध्यक्ष आजाद पठाण, युवा जिल्हा उपाध्यक्ष शेख नदीम, जमीर सहारा यांच्यासह महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमधून आलेले समाजवादी पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.यावेळी उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सैय्यद नफीस यांचे अभिनंदन करून त्यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या. पक्षाची भूमिका तळागाळातील जनतेपर्यंत पोहोचविणे, संघटनात्मक पातळीवर कार्यकर्त्यांना अधिक सक्रिय करणे आणि नागरिकांच्या विविध प्रश्नांना वाचा फोडणे यावरही कार्यक्रमात चर्चा झाली.मुंबई येथील समाजवादी पक्षाच्या महाराष्ट्र प्रदेश कार्यालयात झालेल्या या सत्कार सोहळ्यामुळे पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.

Previous Post Next Post