बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी...
चिखली येथील क्रीडा संकुलामध्ये दिनांक - २७/१०/२०२६ मंगळवार आणि २८/१०/२०२६ बुधवार ला झालेल्या जिल्हास्तरीय शालेय कराटे स्पर्धेमध्ये जळगाव (जामोद) च्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेऊन चमकदार कामगिरी करून त्यांची विभागीय शालेय कराटे स्पर्धेमध्ये निवड झाली आहे. कु. देवयानी मोहन ढगे हिने मुलींच्या १७ वर्षातील ५२ किलो वजन गटा आतील कराटे स्पर्धेमध्ये चांगले प्रदर्शन करून रौप्य पदक (सिल्वर मेडल) पटकाविले. तसेच तीर्थक राजेश पवार ने १७ वर्षांमधील ६८ किलो वजन गटातील कराटे स्पर्धेमध्ये उत्तम कामगिरी करून सुवर्णपदक (गोल्ड मेडल) मिळविले. सदरहू विद्यार्थ्यांची विभागीय शालेय कराटे स्पर्धेकरिता निवड झालेली आहे.विजय प्राप्त विद्यार्थी आपल्या यशाचे श्रेय कराटेचे मुख्य मार्गदर्शक, प्रशिक्षक राजेंद्रकुमार आटक सर आणि आपल्या आई-वडिलांना देतात. यश प्राप्त विद्यार्थ्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.
