जिल्हास्तरीय गोळा फेक स्पर्धेत बी एस पटेल महाविद्यालयाचा फिरोज सोले प्रथम...


 जिल्हास्तरीय गोळा फेक स्पर्धेत बी एस पटेल महाविद्यालयाचा फिरोज सोले प्रथम...

जळगाव जामोद(प्रतिनिधी);        

स्थानिक बापूमिया सिराजोद्दीन पटेल कला, वाणिज्य व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय पिंपळगाव काळे येथील फिरोज सोले  इयत्ता बारावी कला या खेळाडूने बुलढाणा क्रीडा संकुल येथे दिनांक सात ते आठ ऑक्टोबर दरम्यान पार पडलेल्या महाराष्ट्र राज्य क्रीडा व युवा सेवा संचलनालय पुणे मार्फत आयोजित जिल्हास्तर शालेय क्रीडा स्पर्धा अंतर्गत गोळा फेक स्पर्धेमध्ये प्रथम स्थान पटकाविले.त्याची विभागस्तरीय स्पर्धेसाठी निवड करण्यात आली.फिरोज च्या या उत्कृष्ट कामगिरीचे कौतुक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष ॲड. सलीम पटेल साहेब सहसचिव रब्बानी देशमुख सर, उपाध्यक्ष प्रा. कय्युम  पटेल सर, संचालक सिराजभाई पटेल, प्राचार्य मुकुंद इंगळे सर ,उप प्राचार्य अतुल उगले सर, वहिद सर आदींनी केले व त्याला पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या. वरील खेळाडूला महाविद्यालयाचे क्रीडा शिक्षक प्रा. जितेंद्र कचवे यांचे मार्गदर्शन लाभले.

Previous Post Next Post