सय्यद शकिल/अकोट तालुका प्रतिनिधी...
महाराष्ट्र पोलीस दलात पोलीस निरीक्षक म्हणून कार्यरत असलेल्या अँड .शुभांगी मुकुंद कोरडे-दिवेकर यांनी संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठातून पीएच.डी. पदवी संपादन करून पोलीस दलात एक नवा आदर्श निर्माण केला आहे.त्यांनी भारतातील पोलीस दलाच्या सुधारणांचे कायदेशीर विश्लेषण”या विषयावर संशोधन केले.भारतीय पोलीस दलाचे आधुनिकीकरण, पोलीस व्यवस्थेत आवश्यक सुधारणा, कायदेशीर तरतुदी आणि प्रभावी फौजदारी न्यायव्यवस्था राबविण्यात पोलिसांची भूमिका यांचा अभ्यास करणे, तसेच पोलिस तपास दर्जेदार , या सह पोलिसांच्या इतर महत्वाच्या बाबीवर त्यांनी आपल्या प्रबंधात सखोल अभ्यास केला आहे.पोलीस निरीक्षक शुभांगी कोरडे-दिवेकर या सध्या नागरी हक्क संरक्षण समिती, अकोला येथे कार्यरत आहेत. कर्तव्य सांभाळत त्यांनी जिद्द ,परिश्रमाच्या जोरावर यापूर्वी "एलएल.बी", "एल.एल.एम"ही पदवी संपादन केली होती. आता पीएच.डी. पूर्ण केल्यामुळे त्या राज्यातील महिला पोलीस निरीक्षक पदावर पीएच.डी. धारक असलेल्या त्या बहुदा पहिल्याच अधिकारी ठरल्या आहेत.त्यांच्या या उच्च शिक्षणाचा पोलीस दलाला निश्चितच फायदा होईल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. त्यांच्या यशाबद्दल सर्व स्तरांतून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.आपल्या यशाचे श्रेय त्यांनी विद्यापीठातील मार्गदर्शक, पोलीस दलातील वरिष्ठ अधिकारी, कुटुंबातील सर्व सदस्य व परिजनांना दिले आहे.
___________&&_________&_______
पुस्तकांशी जुळले नाते ,अभ्यासाशी नाळ
आपल्या ध्येय निश्चिती कडे प्रामाणिक आणि कठोर परिश्रम घेऊन वाटचाल केली की अशक्यही शक्य करण्याची किमया घडते .त्यासाठी केवळ मानसिकता सकारात्मक असावी लागते .या विविध बाबींना प्रयत्नांची जोड दिल्यावर जो निष्कर्ष निघतो त्याला अनेक जण आश्चर्य असं नाव देतात .मात्र ह्या आश्चर्य कारक कामगिरी आपसूक घडत नसतात त्या मागे त्यागा ची भूमिका निर्णायक असते असेच अँड .पोलीस निरीक्षक शुभांगी कोरडे -दिवेकर यांच्या आचार्य पदवीच्या यशस्वीतेचे सूत्र असावे .
