बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी...
दिवाळीचा सण म्हणजे सर्वत्र नवचैतन्याचा काळ सगळीकडे लगबग असते.सोन्या चांदीचे दागिने, नवीन कपडे खरेदीची, रंगीबिरंगी आकाश कंदील, मिठाई यांनी बाजारपेठा फुलून जातात.दिवाळी सण म्हणजे प्रकाश पर्व मात्र आपल्या समाजात सर्वांनाच या उत्सवाची मजा नाही लुटता येत त्यातीलच आहे काही मनोरुग्ण ज्यांना समाजाने दूर लोटले, त्यांनाच मायेने आपलेसे केले ते बोदवड येथील आत्मसन्मान फाउंडेशनने प्रमिलाई व मोहनराव परीवार मनोरुग्ण पुनर्वसन केंद्राच्या माध्यमातून मनोरुग्णांची सेवा येथे होते.दिवाळीचा सण आपण जसा साजरा करतो त्याचप्रमाणे मनोरुग्णांचीही दिवाळी साजरी व्हावी या उदात्त हेतूने रुग्ण सेवेत अग्रस्थानी असलेल्या ओम साई फाउंडेशन दरवर्षीप्रमाणे यावर्षीचीही दिवाळी मनोरुग्णांसोबत साजरी करण्याचे ठरविताच समाजातील दानशुरांनी मदतीचा ओघच सुरू केला त्या मदतीतूनच ऑक्सिजन किट, किराणा किट,20 किलो फराळ,फळे व इतर साहित्याचे मनोरुग्णांना वितरण करण्यात आले यावेळी मनोरुग्णांच्या चेहऱ्यावरील हास्य पाहून ओम साई फाउंडेशनचे स्वयंसेवक सुखावले या उपक्रमाकरिता समाजातील डॉ, विजय तायडे, डॉ. विजय मोहता,अक्षय राठी, पार्थ पखाले, मुकुंद सर, नामदेव गवळी, प्रशांत हिवाळे, अशोक सुरडकर, मधुकर चोपडे, रवी झगरे, अशोक रवागडे, संतोष टिकार, सुनील देव, शशिकांत गर्गे, विनोद कोल्हटवार अमोल खोडके, भागवत पवार, नंदकिशोर राऊत, सागर मोहेकर, प्रशांत आठवले, विलास तांदुळकर, नामदेव घाटे, प्रशांत धंदर, किशोर पडोळ, संदीप कणखर, डॉ. राऊत, विनायक रुजतकर, वासुदेव तांदळे, अनंता हिंगणे, बळराम तायडे, मनोज जोशी, सलीम बरडे, रवी राठोड, राजेंद्र बनसोड, पुष्पा शिंदे, सागर पाटील, एम एस सय्यद, राजू माकोने, मिरगे साहेब, पंकज वावगे, महादेव तिडके, सतीश बहुरूपे, गजानन वडोदकर, शकील तडवी, चामुंडा स्टील, पुरुषोत्तम वसाने, श्लोक देशपांडे, संदीप देवकर, श्याम खेडेकर, गजानन मेटांगे या दानशूरांनी सढळ हाताने मदत केली. या उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी विलास निंबोळकर, दीपक फाळके,प्रेमचंद जैन, राम इंगळे, गजानन हजारे,किरण इंगळे, कमलेश बोके, राहुल निमकर्डे, विष्णू धांडे, आश्विन फेरण, अमोल ढोले, प्रवीण पारखेडे, वैभव रहाणे, कृष्णा वासोकार, हर्षल ढगे, अभिषेक पुंडे, श्याम जुमडे इत्यादी ओम साई फाउंडेशन च्या स्वयंसेवकांनी अथक परिश्रम घेतले.
