जळगाव जामोद तालुक्यातील जळगाव शहरांमधील नावाजलेली तसेच पूर्ण राज्यात नावलौकिक मिळवलेली एकमेव शिक्षण संस्था स्वामी विवेकानंद राष्ट्रीय ज्ञानपीठ जळगाव जामोद येथे नॅशनल सायन्स दिनाच्या पूर्वसंध्येला दिनांक 27 फेब्रुवारी रोजी शनिवारी संध्याकाळी पाच ते सात वाजेपर्यंत team pinaka च्या माध्यमातून ऑनलाइन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते या कार्यशाळेच्या माध्यमातून पेट्रोल व डिझेल संपल्यानंतर पुढे काय व पर्यायी स्त्रोत याचे उत्तर team pinaka ने कार्यशाळेद्वारे विद्यार्थ्यांसमोर मांडले.team pinaka ही NIMIMS deemed to be युनिव्हर्सिटी च्या अभियांत्रिकी विद्यार्थ्यांचा एक समूह असून त्यांनी shell eco marathon च्या pitch the future या स्पर्धेमध्ये जागतिक स्तरावर पुरस्कार प्राप्त केला आहे.team pinaka ही ऊर्जा संवर्धन आणि ऊर्जा कार्यक्षमता या विषयावर काम करीत आहे ऊर्जा सेक्टरमध्ये पेट्रोल व डिझेलच्या अति वापरातून होणाऱ्या प्रदूषणामुळे लोक त्रस्त झाले आहेत पेट्रोल व डिझेलच्या मर्यादित त्यामुळे पुढे भविष्यात काय हा प्रश्न निर्माण होणारच आहे तसेच इंधनाच्या अतिरिक्त वापरामुळे कार्बन डायॉक्साईडचे प्रमाण वातावरणामध्ये झपाट्याने वाढत आहे यामुळे पृथ्वीचे तापमान देखील दिवसेंदिवस वाढत आहे यावर उपाय काय असा प्रश्न सर्वांनाच पडला आहे या संबंधित कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते विद्यार्थ्यांना भविष्यात नवनवीन इंधन संबंधी काय स्त्रोत राहणार आहेत या सर्व प्रश्नांचा उत्तरा करिता एकंदरीतच आपल्या विचारांना चालना देऊन प्रत्यक्ष कार्य प्रवृत्त करण्याकरिता या वेबीनार चे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक कुमारी अनन्या सिंग निर्वाण तर प्रकल्पाच्या तांत्रिक बाबीविषयी श्री अमित माळपांडे यांनी मार्गदर्शन केले ऑनलाइन कार्यशाळेदरम्यान ऑनलाइन प्रश्नमंजुषा कार्यक्रम करून कुमारी कोमल मोटवानी यांनी घेतला तसेच कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन शंशाक येरी आणि भव्य देसाई यांनी केले. लॉकडाउनच्या विपरीत परिस्थितीवर मात करीत विद्यार्थ्यांच्या विचारांना चालना देण्याकरिता स्वामी विवेकानंद राष्ट्रीय ज्ञानपीठ ही शाळा सदैव तत्पर असते.
विज्ञान दिनाचे औचित्य साधून स्वामी विवेकानंद राष्ट्रीय ज्ञानपीठाणे सुरु केला अभिनव उपक्रम...
जळगांव जा.प्रतिनिधी:-
