खासदार नवनीतराणा यांचा दणका.परतवाडा येथील बँकेत क्रोप लोन देण्यासाठी टाळाटाळ करणाऱ्या स्टेट बँकेचे शाखा व्यवस्थापक यांना घेतले धारेवर..


 अमरावती  जिल्हा प्रतिनिधी:-राजु भास्करे.

शासन निर्णय असल्यानंतर सुद्धा बिनकामी जास्तीचे कागदपत्रांची मागणी करून तसेच, चार- चार महिन्यापासून चकरा मारल्यानंतर सुद्धा हजारो शेतकऱ्यांचे क्रोप लोन मंजूर न करता त्यांना सतत नाहक त्रास दिल्याबद्दल ची तक्रार अमरावती जिल्ह्याच्या लोकप्रिय खासदार नवनीतजी राणा यांना प्राप्त झाली.खासदार मॅडम यांच्या आदेशाने संपर्कप्रमुख उपेन बछले यांनी शेकडो शेतकऱ्यानं सोबत स्टेट बँक गाठले.शाखा व्यवस्थापका सोबत चर्चा केल्यानंतर त्यांनी तात्काळ केलेल्या चुकीची माफी मागितली. व शेतकऱ्यांचे क्रोप लोन मंजूर करून देण्याचे मान्य केले .तसेच यानंतर कुठलेही शेतकऱ्याला आठ दिवसाच्या वर क्रोप लोन द्यायला वेळ लावणार नाही, अशी ताकीद दिल्यानंतर मान्य केले .यावेळेस उपस्थित शेकडो शेतकऱ्यांनी खासदार नवनीत राणा मॅडम सोबत उपेंन बछले यांचे आभार मानले.तसेच यावेळेस ला स्वाभिमान पक्षाचे प्रमुख पदाधिकारी  गोलू अथोटे ,वैभव गोस्वामी, पवन कापशिकर ,रमेश दहिकर सोबत शेकडो शेतकरी उपस्थित होते.

Previous Post Next Post