केदारखेडा येथे विश्वकर्मा फर्निचर वेल्डिंग वर्कशॉप वर 25/02 ला दुपारी 12 वाजता विश्वाला आकार देणारे विश्वकलेची आराध्यदैवत भगवान श्री विश्वकर्मा जंयती व्यापारी महासंघाच्या वतीने गंगाधर मखरे व रामेश्वर पोपळघट यांच्या हस्ते पुष्प हार व दिपप्रज्वलन करून जयंती साजरी करण्यात आली.संपूर्ण जगभरातल्या आलेल्या कोरोना संकटातून मुक्ती मिळो असे साकडे घालत सोशल डिस्टनचा नियम पाळत मोठ्या उत्साहात जयंती साजरी करण्यात आली.यावेळी पंचायत समिति सदस्य कल्याण जाधव.मा.पं.स.सदस्य रमेश पाटील मुरकुटे,विशकर्मा स्वाॅमिल चे संचालक अशोक शर्मा,सुवर्ण शैली ज्वेलर्सचे राजु घुसळकर,विश्वंभर पोपळघट,केदारेश्वर स्टिल फर्निचरचे रामेश्वर जाधव,केदारेश्वर फर्निचर वाल्मिक पिंपळे.भाऊसाहेब मखरे. प्रकाश गाडेकर,अजय जाधव,राजेश साबळे,नारायण कोलते,विकास पंडीत,काकासाहेब वराडे,संतोष पेरे,सुधाकर जाधवसह आदी उपस्थित होते.
केदारखेडा येथे व्यापारी महासंघाच्या वतीने प्रभु श्री.विश्वकर्मा जंयती साजरी...
केदारखेडा प्रतिनिधी:-
