वरणगाव शहरातील हनुमान नगर येथील रहिवासी गोविंदा चांखेडकर यांच्या कडे 16 हजार थकबाकी आहे त्या पैकी 4 हजार भरण्यास तयार होते मात्र वीज वितरण कंपनीने नकार देउन मागासवर्गीय श्री मनोहर चांदखेडकर यांच्या घराची वीज कापली करोना काळात जनतेच्या हाताला काम नाही आपन सक्तीने वीज बिल वसूल करू नका व लाईन बंद करू नका अशी विनंती भाजपाच्या वतीने आज ठिय्या आंदोलनात केली यावेळी उपकार्यकरी अभियंता श्री गांजरे यांनी श्री चांदखेडकर यांना वीज जोडणी करण्याचे आश्वासन यावेळी दिले या प्रसंगी माजी नगराध्यक्ष सुनील काळे भाजपा शहराध्यक्ष श्री सुनील माळी सरचिटणीस गोलू राणे अजय पाटील दीपक चौधरी उपस्तीत होते यापुढे वरणगाव शहरातील वीज कंपनीच्या विरुद्ध जनआंदोलन उभारण्याचा इशारा यावेळी दिला तसेच बिलावर व्याज सुद्धा लावण्यात येणार आहे हे व्याज सुद्धा रद्द करावे करोना काळात लोकांना उदरनिर्वाह करता येत नाही आणि त्यात आपले वीज बिल कुठे भरणार करोना काळात वरणगाव शहरातील वीज कनेक्शन कापू नये असेही शहराध्यक्ष सुनील माळी यांनी सुनावले अन्यथा भाजपा च्या वतीने जनआंदोलन त्रिव करण्यात येईल असे विजवीतरण कंपनीच्या अधिकाऱ्यांना सुनावले.
वरणगाव शहरात वीज कनेक्शन कापल्यास आंदोलन त्रिव करणार.-माजी नगराध्यक्ष सुनील काळे
वरणगाव प्रतिनिधी - सुनील पाचपोळ
