स्थानिक जळगाव जामोद येथे दिनांक 27 फेब्रुवारी रोजी जळगाव जामोद तालुक्याच्या वतीने श्री संत रोहिदास महाराजांची जयंती covid-19 च्या नियमांचे पालन करीत साजरी करण्यात आली यावेळी उत्सव समिती अध्यक्ष व चर्मकार संघटनेच्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत संत रोहिदास महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले तसेच उत्सव समिती अध्यक्ष व चर्मकार संघटनेचे पदाधिकारी यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न झाला कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उत्सव समिती अध्यक्ष पांडुरंग गवई, जिल्हाध्यक्ष राष्ट्रीय चर्मकार महासंघ ज्ञानदेव इंगळे,रविंद्र काकडे ज्येष्ठ विधी सल्लागार, रवींद्र शेगोकार जिल्हा संयोजक गुरु रविदास सत्यशोधक मासिक, नागेश भटकर शहर अध्यक्ष राष्ट्रीय चर्मकार महासंघ, सुखदेव धोटे, रामदास पिंजरकर, शिव हरी रोजतकर, गजानन माटे, प्राचार्य गजानन दांडगे, संदीप इंगळे, अक्षय रोजतकार, प्रमोद रोजतकर यांच्यासह बहुसंख्य नागरिक यांची यावेळी उपस्थिती होती.
जळगाव जामोद येथे संत रोहिदास महाराज यांची जयंती साजरी...
जळगांव जा.प्रतिनिधी:-अनिल भगत.
