जळगांव जामोद शहरातील सन २०१७-१८ च्या घरकुल लाभार्थी यांना होत असलेल्या नाहक त्रासासाठि नगरसेवक तथा शिक्षणसभापती रमेशभाऊ ताडे यांनी मुख्याधिकारी व नगराध्यक्षा यांना निवेदन देण्यात आले या निवेदनात जळगांव जामोद शहरातील प्रधानमंत्री घरकुल आवास योजनेंतर्गत सन २०१७-२०१८घरकुल काही लाभार्थी यांना पहिला हप्ता देण्यात आला व दुसरा हप्ता मिळण्यासाठी नगरपरिषदेचे उंबरठे घासावे लागत आहे बरेचशा लाभार्थी यांनी तर आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करून वर्ष उलटले तरि सुद्धा घरकुलाच्या पहिल्या हपत्याच्या प्रतिक्षेत आहेत प्रभाग क्रमांक १ व ४ मध्ये अतिशय गरिबी, वंचित लोक राहत असुन अनेक कुटुंबांना आपला संसार उघड्यावर थाटला आहे अशा प्रकारे सामान्य नागरिकांना प्रशासनामुळे नाहक त्रास सहन करावा लागत आहे वरिल प्रकारच्या लाभार्थी यांना होत असलेल्या नाहक त्रास बंद न झाल्यास लाभार्थी यांच्यासह लोकशाही मार्गाने आंदोलन करण्यात येईल याची शासन प्रशासन यांनी नोंद घ्यावी असे निवेदनात म्हटले आहे.निवेदन देतेवेळी जळगांव जामोद नगरिचे नगरसेवक तथा शिवसेना तालुकाप्रमुख गजानन भाऊ वाघ, शिक्षणसभापती रमेशभाऊ ताडे, नगरसेवक कलिमभाई, पुंडलिक मिसाळ, गणेश ताडे, सुमनबाई ताडे,पार्वताबाई हागे, गजानन वंडाळे,प्रकाश भगत यांच्या सह इतर लाभार्थी यांच्या सह्या आहेत
प्रधानमंत्री घरकुल योजनेच्या लाभार्थ्यांना होत असलेल्या त्रासाबद्दल नगरसेवकांनी दिले निवेदन..
जळगांव जामोद शहर प्रतिनिधी:-
