जळगाव जामोद शहरामध्ये कोरोना महामारी च्या प्रादुर्भावामुळे जीवनावश्यक वस्तूचे प्रतिष्ठाने यांचे सोबत इतर छोटे छोटे व्यापारी यांचे प्रतिष्ठाने चालु ठेवण्यासाठी आज दिनांक २४ फेब्रुवारी रोजी उपविभागीय अधिकारी जळगाव जामोद यांच्या मार्फत जिल्हा अधिकारी यांना निवेदन व्यापारी संघटनेच्यावतीने देण्यात आले या निवेदनामध्ये शहरातील लहान व्यापारी यांची दुकाने बंद ठेवल्याने त्यांच्यामध्ये व लहान व्यापारी यांच्यातज् ताण तणावाचे वातावरण निर्माण होणार नाही आणि त्या छोट्या व्यापार्यांवर उपासमारीची पाळी येऊ नये त्यासाठी कोरोणाचे सर्व नियम पाळून छोट्या व्यापाऱ्यांना दुकाने चालू ठेवण्याची परवानगी देण्यात यावी त्याउलट जळगाव शहरामध्ये अवैध धंदे सर्रासपणे सुरू आहेत व अवैध प्रवासी वाहतूक सुद्धा होतांना दिसत आहे आणि त्या ठिकाणी प्रशासन दुर्लक्ष करित असुन सर्व नियमांची पायमल्ली होत आहे . पुढे निवेदनात असे नमुद आहे कि जीवनावश्यक प्रतिष्ठाने यांच्यासोबतच लहान व्यापारी यांनासुद्धा दुकाने चालू ठेवण्याची परवानगी देऊन सर्व नियमांच्या अधीन राहून वेळ वाढवून देण्याची परवानगी देण्यात यावी व व्यापारी बांधवांवर अन्याय कारक व अनावश्यक होणारी कारवाई त्वरित थांबवण्यात यावी अशा आशयाचे निवेदन देण्यात आले या निवेदनावर व्यापारी संघटनेचे तालुका अध्यक्षासह संघटनेच्या पदाधिकाऱ्यांच्या सह्या आहेत.
जळगांव जामोद शहरातील व्यापारी संघटनेने दिले निवेदन...
जळगांव जामोद प्रतिनिधी:-
