पिकवीम्यासाठी एल्गार संघटनेचा अनोखा उपक्रम..


 जळगाव जा.प्रतिनिधी:-अनिल भगत.

                  एल्गार संघटना गेल्या काही महिन्यांपासून पिकवीम्यासाठी आक्रमक भूमिकेत दिसत आहे. २२ फेब्रुवारी पासून चालू झालेल बेमुदत ठिय्या आंदोलन कोविड-१९ च्या प्रादुर्भावामुळे रद्द कराव लागल. परंतु अश्याहि परिस्थितीत शेतकऱ्यांच्या हक्काचा पिकवीमा मिळवून देण्यासाठी एल्गार संघटनेच्या वतीने जो पर्यंत पिकवीमा मंजूर होत नाही तो पर्यंत कोविड-१९ चे सर्व नियम पाळत ४ लोकांच्या वतीने दरदिवशी पुष्पगुच्छ व निवेदन देण्याचा स्थूत्य उपक्रम चालू करण्यात आला आहे. आज दिनांक २४ फेब्रुवारी या उपक्रमाचा दूसरा दिवस यावेळी एल्गारचे तालुकाध्यक्ष अजहर देशमुख,प्रसिद्धी प्रमुख आशिष वायझोड़े, संजय देशमुख,मुजहिर मौलाना यांनी उपविभागीय अधिकारी यांना पुष्पगुच्छ देऊन निवेदन देण्यात आले.

Previous Post Next Post