आजकाल लग्नामध्ये वधूवरांना स्टीलची भांडी ,प्लास्टिक, फायबर चे साहित्य देण्याची प्रथा पडलेली आहे. बरेच नातेवाईक ह्या वस्तू वधू मुलीला लग्नात सप्रेम भेट देत असतात. कित्येक वस्तू परत ,परत त्याच येतात. त्यामुळे अवास्तव साहित्याची वाढ होते. परंतु ह्याचा पाहिजे तेवढा उपयोग घरसंसारात वधूवरांना होत नाही.आपण ह्या वस्तू देऊ वधूवरांना पेक्षा व्यापाऱ्यांचा जास्त फायदा करतो ,हे गृहीत धरून माळीखेल मधील युवकांनी एक स्तुत्य उपक्रम राबवला. दिनांक २८ फेब्रुवारी रोजी स्थानिक स्वर्गीय सुरेश तुकाराम दंडे यांची सुकन्या,अतुल दंडे यांची भगिनी चि. सौ. का. दुर्गा हिचा विवाह स्थानिक नारायण तुकाराम म्हसाळ यांचे चिरंजीव विशाल यांचे सोबत संपन्न झाला. ह्या वेळी माळी खेल मधील युवकांनी ह्या वधूला भांडीकुंडी भेटवस्तू न देता रोख रक्कम देण्याचे ठरवले. सर्व युवकांनी सहयोगातून एक मोठी रक्कम उभारून स्थानिक श्री.महासिद्ध अर्बन पतसंस्थेचे बावीस हजार रुपये किमतीचे सुरक्षा पत्र घेऊन वधूला सुपूर्द केले. दाम दुप्पट योजनेतील आज अकरा हजार रुपयाचे हे सुरक्षा पत्र नऊ वर्षानंतर संबंधित वधूला बावीस हजार रुपये मिळवून देईल. त्या २२ हजार रुपयांचा तिला संसारात फार मोठा हातभार लागेल. माळीखेल येथील सामाजिक चळवळीत सदैव अग्रेसर असलेले अतुल दंडे यांची दुर्गा ही बहिण असून माळीखेल मधील च संजय इंगळे ,अनिल इंगळे,राहुल राजनकार,विलास मानकर,गजानन म्हसाळ,राजू अढाऊ,यांचे पुढाकाराने हा उपक्रम राबविण्यात आला.या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत असून असाच उपक्रम गावागावात राबवल्यास वधूकडील मंडळींना आर्थिक सहाय्य करता येईल.
माळीखेल मध्ये युवकांचा अभिनव उपक्रम लग्नामध्ये वधूला भांडीकुंडी न देता दिले दामदुप्पट ठेव सुरक्षा पत्र..
जळगाव जामोद प्रतिनिधी:-अनिल भगत.
