जळगाव महानगरपालिकेवर शिवसेनेचा भगवा फडकला. वरणगाव बस स्टँड चौकात शिवसेनेतर्फे आनंदोत्सव साजरा...


 वरणगाव प्रतिनिधी: - सुनील पाचपोळ 

जळगाव जिल्ह्यातील राजकारणाचा महत्त्वाचा टप्पा असलेली जळगाव शहर महानगरपालिका गेल्या अडीच वर्षापासून भाजपची सत्ता असल्याने भकास झाली होती त्यामुळे ज्या नगरसेवकांना आपापल्या प्रभागात कामे करण्याची इच्छा असतानाही भाजपच्या नीतीमुळे करता येत नव्हती त्यांनी सरळ माननीय उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या उपस्थितीत महानगरपालिकेवर शिवसेनेचा भगवा फडकवण्याचा निश्चय व्यक्त केला महा विकास आघाडीच्या चांगला कामांची धडक पाहता महानगरपालिकेच्या नगरसेवकांनाही आपल्या शहराचा विकास करण्यासाठी शिवसेनेत जाऊन शिवसेनेचा भगवा मनपावर फडकला व महापौरपदी सौ जयश्री महाजन व उपमहापौर पदी श्री कुलभूषण पाटील यांची वर्णी लावली यामुळे आनंदित झालेल्या भुसावळ तालुक्यातील शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिकांनी दोन्ही नवनियुक्त महापौर उपमहापौर यांचे अभिनंदनासाठी वरणगाव बस स्टँड चौकात फटाके फोडून आनंदोत्सव साजरा केला व हे सर्व घडवून आणणाऱ्या नेत्यांचे आभार व्यक्त केले प्रसंगी शिवसेना तालुकाप्रमुख समाधान महाजन उपजिल्हा संघटक विलास मुळे अल्पसंख्यांकांचे उपजिल्हा संघटक सहित मुल्लाजी उपतालुकाप्रमुख सुभाष चौधरी गटप्रमुख प्रकाश कोळी पंचायत समिती सदस्य विजय सुरवाडे तळवेल चे उपसरपंच उल्हास भारसके सुभाष चौधरी  तालुका राष्ट्रवादीचे तालुका संघटक राजेश चौधरी राष्ट्रवादीचे वरणगाव शहराध्यक्ष संतोष माळी राष्ट्रवादीचे शहर उपाध्यक्ष अनिल चौधरी यांच्यासह शिवसेनेचे अल्पसंख्यांकांचे तालुका संघटक अब्रार खान शिवसेना विभाग प्रमुख प्रकाश कोळी आबा सोनार निलेश ठाकूर सागर वंजारी साई चरण चौधरी राहुल वंजारी दीपक पाटील कुणाल महाजन अंकुष भोंडे विजय कुंभार दीपक सिंग पाटील कृष्णा पुजारी नितीन पाटील प्रशांत पाटील राहुल सुरवाडे अमर सोनार यांच्यासह  भुसावळचे शहर प्रमुख निलेश महाजन  यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते तसेच महा विकास आघाडीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी देखील यात सहभाग घेतला.

Previous Post Next Post