तहसील मध्ये सर्वत्र रेतीवर बंदी असताना मात्र धारणी तहसील कार्यालयात जोमाने बांधकाम सुरु आहे. तालुक्यामध्ये सर्वदूर रेती अभावी सर्व शासकीय विकासकामे व प्रधानमंत्री आवास योजनेतर्गत बांधकामे रखडले असताना तहसील मध्ये मात्र रेती. कुठून येत आहे हे अद्याप कोणालाच समजले नाही.वाळूचोरी प्रकरणी बरेच ट्रॅक्टर तहसील मध्ये जमा असताना त्यामधील रेती दिवसेंदिवस कमी होताना दिसत आहे.एकीकडे गेल्या चार वर्षांपासून एकही रेतीघाटाचा विविध करणे दाखवून लिलाव झाला नाही.त्यामुळे बांधकाम क्षेत्रातील मजूर मिस्त्री, ठेकेदार यांची चांगलीच पंचाईत झाली आहे. प्रधानमंत्री आवास योजनेॅतर्गत एखाद्या लाभार्थ्याने जरी रेती नदीतून बैलबंडीने आणली तरी महसूल प्रशासन त्या व्यक्तीवर कार्यवाही करते. मात्र सर्वदूर रेतीवर बंदी असताना महसूल चे मुख्यालय तहसीलकार्यालयामध्ये कुठून रेती येत आहे.हा विचार सर्व तालुकावासी करीत आहेत.
रेतीवर बंदी असताना मात्र तहसील मध्ये बांधकाम सुरु...
राजु भास्करे:-अमरावती जिल्हा प्रतिनिधी
