जळगांव जा.प्रतिनिधी:-
गेल्या नऊ दिवसांपासून एल्गार संघटनेच्या वतीने पिकवीम्यासाठी उपविभागीय अधिकारी कार्यालय जळगाव जामोद यांना पुष्पगुच्छ व निवेदन देण्यात येत आहे. परंतु अध्यापही प्रशासनाकड़ून कोनतीच कार्यवाही होतांना दिसत नाही. अद्याप पर्यंत नाही प्रशासनाच्यावतीने शेतकऱ्यांना पीक विमा संबंधित कोणताच मेसेज किंवा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये विम्याची रक्कम अद्याप पर्यंत जमा झालेली नाही म्हणून दिनांक ८ मार्च २०२१ रोजी एल्गार संघटनेचे कुरनगाड येथील पदाधिकारी शत्रुघ्न कोकाटे,कृष्णा वसतकार,मंगेश देशमुख,हरिदास कवळे यांनी बेशरम प्रशासनाला बेशरमची फुले देऊन निवेदन देण्यात आले.