विस्तार अधिकाऱ्यांविरुद्ध निलंबनाच्या कारवाईसाठी जामोद ग्रामपंचायत सदस्यांचे मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांना निवेदन...


जळगांव जा.प्रतिनिधी:-

जळगाव जामोद तालुक्यातील जामोद येथील विस्तार अधिकारी संदीप मोरे यांनी केलेल्या जामोद ग्रामपंचायत मधील भ्रष्टाचाराबद्दल त्यांच्यावर निलंबनाची कारवाई व्हावी याबाबतचे निवेदन दिनांक 4 मार्च रोजी जामोद ग्रामपंचायतचे सदस्य संजय नामदेव धोंडे यांच्यासह बारा सदस्यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद बुलढाणा यांच्याकडे दिलेल्या निवेदनाद्वारे मागणी केली आहे दिलेल्या निवेदनात असे नमूद केले आहे की वरील संदर्भीय विषयास अनुसरून विनंती करण्यात येते की सन 2018 -19 मध्ये जामोद येथील घरकुले नियमाकुल करण्यामध्ये विस्तार अधिकारी मोरे यांनी खूप मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केला आहे.2018-19 मध्ये अतिक्रमित जागेवर घरकुल नियमाकुल करणे करिता ग्रामपंचायत ने 21 नोवेंबर 2018 रोजी ठराव क्रमांक 911 यामध्ये 11 लाभार्थ्यांची यादी मंजूर केली असता मोरे यांनी याव्यतिरिक्त आणखी 42 लाभार्थ्यांची यादी दिली या लाभार्थ्यांच्या जवळून हजारो रुपयांची रक्कम मोरे यांनी घेतली आहे तरी जामोद ग्रामपंचायत विस्ताराधिकारी संदीप मोरे यांना तात्काळ निलंबित करा या मागणीसाठी निवेदन देण्यात आले या निवेदनावर दीपक श्रीराम घाटे मनोहर श्रीराम भगत दुर्गा गजानन ढगे प्रमिला रमेश हागे सलाम खॉ जहागिर खॉ, नसिर खॉ छोटे खॉ, लिलाबाई मोतीराम धुर्डे, गीता धुर्डे, सविता ढगे शहाजान बी रशीद खा,संजय धुर्डे, प्रेमकुमार जयस्वाल, इत्यादी ग्रामपंचायत सदस्यांच्या सह्या आहेत.

Previous Post Next Post