विशेष प्रतिनिधी:-
करोना काळात पाठवण्यात आलेल्या वाढीव वीजबिलांच्या मुद्द्यावरून सभागृहात आज गोंधळ उडाला , विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रश्नोत्तराचा तास तहकूब करून वाढीव वीज बिलाच्या मुद्द्यावर चर्चा घेण्यात यावी, अशी मागणी केली.सभागृहात गोंधळ सुरू झाल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मध्यस्थी करत - राज्यातील वीज तोडणी मोहिमेला स्थगिती देत असल्याची घोषणा केली आहे.पहा काय म्हणाले उपमुख्यमंत्री ?उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले , राज्य सरकारच्या वतीने मी सांगतो कि जोपर्यंत ऊर्जा विभागाची वाढीव वीज बिलाच्या मुद्द्यावर चर्चा होत नाही, तोपर्यंत राज्यातील शेतकऱ्यांचे, तसेच सर्वसामान्य नागरिकांचे वीज कनेक्शन तोडणं थांबण्यात येईल. असे ते म्हणाले
दरम्यान यावर देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवार आणि सरकारचे आभार मानले - तसेच ज्यांची वीज तोडली, त्यांच्या जोडून द्या. त्यांनाही समान न्याय द्या, अशी माझी विनंती आहे - असे फडणवीस म्हणाले राज्यातील ‘वीज कनेक्शन तोडणी ला आता स्थगिती मिळाली आहे , हि माहिती नागरिकांसाठी नक्कीच महत्वाची आहे.
