कुणाची ही वीज तोडल्या जाणार नाही अजितदादांचे आश्वासन.भाजपच्या आंदोलनाला यश...


 मुंबई प्रतिनिधी:-

कोणत्याही घरगुती वीज जोडणी कट करण्यात येणार नसल्याचे आश्वासन उपमुख्यमंत्री ना अजितदादा पवार यांनी दिल्याने राज्यभरात भारतीय जनता पक्षाच्या वतीने सरकार विरोधातील आंदोलनाला यश आले आहे.  अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच दि 2/3/2021 रोजी भारतीय जनता पक्षाचे वतीने विधानसभेच्या पायऱ्यांवर आंदोलन करण्यात आले.लॉकडाउन काळापासून थकीतअसलेल्या वीज बिलांच्या वसुलीसाठी महावितरण कंपनीने वीज जोडणी कट करण्याची धडक मोहीम सुरू केली होती. त्यामुळे राज्यभर आक्रोश निर्माण झालेला आहे.  याबाबत भारतीय जनता पार्टीने राज्यभर आंदोलन करून वीज जोडणी कट न करण्याबाबत सरकारवर दबाव टाकला होता.  आज विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असून अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी विरोधी पक्षाकडून विधानसभेच्या पायऱ्यांवर आणि सभागृहातही जोरदार घोषणाबाजी करत  वीजजोडणी कट न करण्याबाबत जोरदार दबाव टाकीला होता. त्या अनुषंगाने उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी कोणत्याही प्रकारची वीज कट न  करण्याचे आश्‍वासन सभागृहाला दिल्याने भाजपाचे आंदोलनाला प्रचंड यश आले आहे . यामध्ये विरोधी पक्षनेते तथा माजी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस , प्रविनजी दरेकर , प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील , तथा भाजपच्या सर्व आमदार सहभागी झाले होते . चिखली विधानसभा मतदारसंघाच्या आमदार असा श्वेता ताई महाले त्यांनीसुद्धा विधानसभेच्या पायऱ्यांवर बसून आंदोलनात सक्रिय सहभाग घेतला होता . तसेच गेल्या वर्षभरापासून भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून चिखली व बुलढाणा येथे वीज वितरण कंपनी ठिय्या आंदोलन,  वीज बिलांची होळी करून त्यांनी सरकारचे लक्ष वेधले होते .

Previous Post Next Post