फलटण च्या भुमि अभिलेख कारभाराकडे नागरीकांसाठी कोण लक्ष देईल ?


 फलटण ता.प्रतिनिधी: - गोविंद मोरे.

फलटण च्या भुमि अभिलेख कारभाराकडे शेतकर्‍यांच्या साठी कोण लक्ष देईल का अशा चर्चा नागरीकांमध्ये होत आहेत   फलटण तालुक्यातील  भुमी अभिलेख कार्यालयात दिवसा ढवळ्या शेतकर्‍यांना लुटल्याचे बोलले जात आहे भुमि अभिलेख कार्यालय मध्ये पैसे विना या ठिकाणी कोणतेच काम केले जात नाही  प्रतेक शेतकर्‍याला सर्वसामान्य नागरीकांना या ठिकाणी खुप त्रास सहन करावा लागत आहे भुमिअभिलेख कार्यालयामध्ये अधिकारी मस्त कर्मचारी बेशीस्त नि नागरीक त्रस्त  असे होत असताना  देखील येथील वरीष्ट अधिकारी या कडे दुर्लक्ष केल्याचे नागरीकांमध्ये बोलले जात आहे  फलटण तालुक्यातील सर्वात मोठा पैशाचा बाजार या ठिकाणी होत असल्याचे चर्चा नागरीक करत आहेत   गोरगरीब नागरीक या करोनाच्या काळात दररोज ये जा करतात आणि या ठिकाणी  मात्र   नागरीकांना हकलून देण्याचे काम भूमिअभिलेख कार्यालयात सूरू आहे या कोरोणाच्या काळात सुध्दा या आॅफीस मध्ये  वरीष्टानपासून ते सर्वच अधिकारी कर्मचारी कोरोना चे नियम या ठिकाणी पाळत नाहीत व जे अधिकारी पैशाची मागणी करतात अशा अधिकार्‍यांन वर कारवाई होईल का व फलटण तालुक्यातील  भुमिअभिलेख कार्यालयाचा कारभार सुरळीत कधी चालेल काय असे नागरीक बोलत आहेत.

Previous Post Next Post