जळगाव जामोद तालुक्यातील पिंपळगाव काळे येथील वाल्मीकि नगर मध्ये दिनांक 18 मार्च रोजी गोठ्याला दुपारी २.४५ ते ३ च्या सुमारास भीषण आग लागली होती. आग विझवण्यासाठी अग्निशामक दलाची १ गाडी दाखल झाली व आग पूर्णपणे विझवली व सुदैवाने आगीच्या घटनेत कुठलीही जीवितहानी झाली नाही. आगीची माहिती समजताच घटनास्थळी अग्निशामक दलाची १ गाडी दाखल झाली. गोठ्या मधले सर्व लाकडे. बैलांची कुटार. चारा. सर्व आगी मध्ये भस्मसात झाले. ही आग इतकी भीषण होती की वाल्मिकी नगर मध्येच नाही तर दुरुन सुद्धा काळा धुराचे लोळ दिसत होते. गोठ्याला लागूनच असलेल्या घरामधील नागरिक घाबरून घराबाहेर पळाले. या लोकांचे म्हणणे आहे की विलास मांडोकार ग्रामपंचायत सदस्य पिंपळगाव काळे. व दामोदर ईनकर पिंपळगाव काळे ज्या ठिकाणी आग लागली ती जागा जिल्हा परिषद केंद्रीय मराठी प्राथमिक शाळा पिंपळगाव काळे यांची आहे.
व त्या शेतामध्ये पूर्णपणे अतिक्रमण केले आहे. याची माहिती आम्ही शाळा व्यवस्थापन समिती पिंपळगाव काळे. जिल्हा परिषद.पंचायत समिती. ग्रामपंचायत सदस्य व सरपंच यांना कळविले आहे. व आग लागली हा एरिया पूर्णपणे गरीब आहे. व सर्व झोपडीचे घरे आहे. आग पुर्ण पसरली असती तर पूर्ण घरे या आगीमध्ये भस्मसात झाले असते याची दक्षता शासनाने घ्यावी व हे अतिक्रमण काढून शाळेने येथे आम्हा सर्व नागरिकांना चांगली सुविधा करून द्यावी व व्यायाम शाळा. गार्डन. क्रिकेट ग्राउंड. ऎवढी सुविधा आम्हाला करून द्यावी ही शासनाला विनंती आहे.आग लागल्याचे कारण अजूनही अस्पष्ट असून पुढील तपास पोलीस उमेश शेगोकार व त्यांची टीम करीत आहेत.

