covid-19 नियमांचे काटेकोर पालन करून एका वर्गात 25 विद्यार्थी बसून कोचिंग क्लासेस सुरू करण्याची परवानगी मिळणे बाबत निवेदन देण्यात आले. वर्षभरापासून खाजगी शिकवणी वर्ग संपुर्णतः बंद होते. सर्व संचालकांनी महाराष्ट्र शासनास व प्रशासनास सहकार्य केले. मधील काळामध्ये क्लासेसला मर्यादित स्वरूपात परवानगी मिळाली होती सध्या असलेल्या संचारबंदी च्या काळात पुन्हा कोचिंग क्लासेस बंद ठेवण्याचे निर्देश आपण दिले आहे.सदर विषय बुलढाणा जिल्ह्यातील कोचिंग क्लासेस च्या संचालकांनी राष्ट्रवादी काँग्रेस वक्ता विभाग बुलढाणा यांच्याकडे उपस्थित केला असुन डबघाईला आलेला व्यवसाय,कोचिंग क्लासेस च्या जागेचे भाडे इत्यादी खर्च उचलून उपजीविका भागवणे सध्या कठीण जात असल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले.सोबतच इतर सर्व आस्थापणे सुरू असताना व लग्न समारंभ करिता 25 लोकांची मर्यादा आपण दिली आहे, त्यामुळे शिक्षणासारख्या पवित्र कार्य करणारे कोचिंग क्लासेस बंद ठेवून व सक्त दंड वसुली करून आपल्यावर होणाऱ्या अन्यायाला त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस समोर व्यथित केले.महोदय इतर जिल्ह्यांमध्ये जसे 5 ते 9 वी वर्ग वगळून दहावी व बारावीचे क्लासेस सुरू आहेत त्या नियमांनी कोचिंग क्लासेस संचालकांना बुलढाणा जिल्ह्यामध्ये सुद्धा परवानगी देण्यात यावी.तरी ज्ञानदानाचे पवित्र कार्य करणाऱ्या या क्षेत्राला अबाधित ठेवण्यासाठी व त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस वक्ता विभाग बुलढाणा जिल्हा यांच्या वतीने आपणास ही विनंती करण्यात येते की covid-19 नियमांचे काटेकोर पालन करून एका वर्गात 25 विद्यार्थी बसवून कोचिंग क्लासेस सुरू करण्याची परवानगी मिळावी तसेच या नियमांचे काटेकोर पालन करणाऱ्या संचालकांवर होणारी दंडात्मक कार्यवाही त्वरित थांबवावी करिता निवेदन देत आहोत. सदर मागणीचा आपण सहानुभूतिपूर्वक विचार करून न्याय द्यावा अन्यथा राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे सोशल डिस्टंसिंग आंदोलन व मोर्चाचे पाऊल उचलण्यात येईल.आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार डॉक्टर राजेंद्रजी शिंगणे साहेब यांच्यासोबत या सदर विषयाचा पाठपुरावा सुरू आहे.जिल्हाधिकारी यांना निवेदन देतांना प्रा. अमोल वानखेडे पाटील (जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस वक्ता विभाग बुलडाणा जिल्हा),गौरव देशमुख (तालुका अध्यक्ष राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस बुलडाणा),अमोल सोनोने(तालुका उपाध्यक्ष राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस बुलडाणा),विशाल फदाट पाटील(सच्चा कार्यकर्ता राष्ट्रवादी काँग्रेस),प्रा.राम कुटे सर यांची उपस्थिती होती.
कोचिंग क्लासेस सुरू करण्याची परवानगी द्या या मागणीसाठी जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस बुलढाणा ने दिले निवेदन..
बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी:-
