आमदार डॉ. संजय कुटे यांच्या वाढदिवसानिमित्त जळगावात मंगळवारी भव्य रक्तदान, नेत्ररोग तपासणी शिबीर...


 जळगाव जा प्रतिनिधी:-

माजी कॅबिनेट मंत्री तथा जळगाव जामोद विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार डॉ. संजय कुटे यांच्या वाढदिवसानिमित्त मंगळवार ९ मार्च रोजी जळगाव जामोद येथे भव्य रक्तदान तथा नेत्ररोग तपासणी शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे.  

जळगाव जामोद येथील सांस्कृतिक भवनात सकाळी ९ ते दुपारी ३ या वेळेत हे शिबीर होईल. भारतीय जनता पार्टी व भारतीय जनता युवा मोर्चा जळगाव जामोद विधानसभा मतदारसंघाच्या वतीने शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे.  कोरोनामुळे सध्या रक्ताचा तुटवडा जाणवत असल्याने हे शिबीर आयोजित करण्यात आले असल्याची माहिती आयोजकांनी दिली. नेत्ररोग तपासणी शिबीरात मोतीबिंदुमुळे अंधत्व आलेल्या रूग्णांची नेत्रतज्ञांमार्फत तपासणीही करण्यात येईल. मोतीबिंदु आढळलेल्या रूग्णांची मोफत लेन्स शस्त्रक्रिया करून देण्यात येणार आहे. विशेष म्हणजे सध्या कोरोना साथ रोग काळ असल्याने शिबीराला येताना कोरोनाच्या धर्तीवर शासनाने घालून दिलेल्या सर्व नियमांचे पालन करावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.नेत्ररोग तपासणी शिबिराकरिता नोंदणीसाठी भाजपा युवामोर्चा तालुकाध्यक्ष परीक्षित ठाकरे, शहराध्यक्ष उमेश येऊल यांच्याशी संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Previous Post Next Post