धारणी च्या गटविकास अधिकाऱ्याला शिक्षक वेतन बाबत कारणे दाखवा नोटीस...

राजु भास्करे:-अमरावती जिल्हा प्रतिनिधी.

धारणी पंचायत समिती अंतर्गत शिक्षकांना माहे जानेवारी 2021 पासून वेतन न मिळाल्याने महाराष्ट्र शिक्षक परिषद व महाराष्ट्र शिक्षक समिती यांच्या संयुक्त विद्यमाने 16मार्च रोजी शिक्षकांनी पंचायत  समिती समोर ठिय्या आंदोलन केले. व गटविकास अधिकाऱ्यांना निवेदन दिले. तसेच ज़ि. प. मुख्यकार्यपालन अधिकारी यांना ही कळविले होते.तसेच सर्व प्रसार माध्यमानी या आंदोलनाला प्रसिद्धी. दिल्याने सर्वत्र चर्चेचा विषय झाल्याने,यावर मुख्य कार्यपालन अधिकारी अमोल येडगे यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली असून शिक्षण अधिकाऱ्यांना धारणी गटविकास अधिकारी व गटशिक्षणाधिकारी यांना कारणे दाखवा नोटीस देण्याच्या सूचना दिल्या. त्यावर शिक्षणाधिकारी यांनी शिक्षकांच्या वेतणाचा विलंबाबत 19 तारखेपर्यत कारणे दाखवा नोटीस द्वारे जाब विचारला आहे.तसेच भविष्यात अश्या प्रकारचे विलंब होणार नाही याबाबत सूचना दिल्या आहेत.

Previous Post Next Post