रविकांत तुपकरांच्या नेतृत्वात नागपूर-औरंगाबाद महामार्गावर पेठ येथे जोरदार चक्काजाम आंदोलन..


 औरंगाबाद जिल्हा प्रतिनिधी:-

लॉकडाऊन काळातील वीज बिल माफ करा व कनेक्शन कापणे थांबवा..अन्यथा मुख्यमंत्री व ऊर्जा मत्र्यांच्या घराचे विज कनेक्शन कापणार - रविकांत तुपकर..लॉकडाऊन काळातील वीज बिल माफ करावे व सक्तीची विजबिल वसूली थांबवून कनेक्शन कापणे  तात्काळ थांबवावे या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांच्या नेतृत्वाखाली नागपूर - औरंगाबाद महामार्गावर पेठ ता.चिखली जि.बुलडाणा) येथे रास्तारोको करण्यात आला. जर सरकारने लॉकडाऊन काळातील वीज बिल माफ केले नाही तर आम्ही ऊर्जा मंत्री व मुख्यमंत्री यांच्या घरांचे वीज कनेक्शन कापू , असा इशारा रविकांत तुपकरांनी यावेळी दिला.. सकाळ पासून चाललेल्या रास्तारोको मुळे महामार्गावर वाहनांच्या लांबच - लांब रांगा लागल्याने महामार्गावर अडीच तास वाहतूक खोळंबली होती...यावेळी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त ही तैनात होता..  या आंदोलनात नितीन राजपूत, विनायक सरनाईक, सुधाकर तायडे, रामेश्वर अंभोरे, संतोष शेळके,भारत खंडागळे, अनिल चव्हाण, रविराज टाले, गणेश थुट्टे, सुदर्शन वाघमारे,अविनाश झगरे,छोटु झगरे, अवचितराव वाघमारे, कैलास शेळके,पवण डुकरे, पांडुरंग शेळके, विष्णु डुकरे, विष्णु शेळके, भगवान गायकवाड, सदानंद डुकरे, गजानन शेळके, उद्धव शेळके,रुषी भाकडे, ईश्वर शेळके,भरत शेळके, परमेश्वर शेळके,बबन कुटे उपस्थित होते..

Previous Post Next Post