तालुक्यातील वडशिंगी आणि आडोळ बुद्रुक साठी सरपंच पदाचे नव्याने आरक्षण जाहीर...


 जळगाव (जामोद) प्रतिनिधी:-

जळगाव जामोद तालुक्यामध्ये यापूर्वी झालेल्या सरपंच निवडणुकीत रिक्त राहिलेल्या तालुक्यातील वडशिंगी आणि आडोळ बुद्रुक येथील सरपंच पदाचे आरक्षण जिल्हाधिकारी कार्यालयात काढण्यात आले. त्यानुसार वडशिंगी सरपंचपद हे नागरिकांच्या मागासवर्गीय प्रवर्गासाठी तर  आडूळ बुद्रुक चे सरपंच पद अनुसूचित जाती महिलासाठी आरक्षित करण्यात आले आहे.यापूर्वी वडशिंगी सरपंचपद अनुसूचित जमाती महिला साठी आरक्षित होते,परंतु अनुसूचित जमातीचा सदस्य निवडून न आल्याने ते पद रिक्त ठेवण्यात आले होते. त्यावेळी केवळ उपसरपंच पदाची निवडणूक झाली होती, आणि उपसरपंच पदी श्याम सुरेश देवचे यांची निवड झाली होती. तसेच आडोळ बुद्रुक चे सरपंचपद सुद्धा यापूर्वी अनुसूचित जमातीसाठी आरक्षित होते.ह्या  प्रवर्गाची व्यक्ती निवडून न आल्याने तिथं सुद्धा सरपंच पद रिक्त ठेवू उपसरपंचपदी योगेश वसंतराव भोजने यांची निवड करण्यात आली होती. आता वडशिंगी सरपंच पदी नागरिकांच्या मागास प्रवर्गातून तर आडोल बुद्रुक सरपंच पदी अनुसूचित जाती महिला प्रवर्गातील सरपंच निवड होईल, असे तहसील विभागाच्या निवडणूक निर्णय कार्यालयाने कळविले आहे.

Previous Post Next Post