हिवरखेड येथील अकोट रोड वरील हिंदू स्मशानभूमीत प्राथमिक सुविधांचा अभावामुळे नागरिकांची प्रचंड गैरसोय होत असून ग्रामपंचायतने अशा आवश्यक बाबीकडे लक्ष देण्याची गरज आहे, हिवरखेड आकोटरोडवरील गाडगेबाबा मशान भूमीत कित्येक दिवसांन पासून पाणी व लाईट नसल्याने मुतदेह आणणाऱ्या नागरिना हेलपाटे सहन करावे लागतात, हिंदू संस्कृती नुसार प्रक्रिया करण्यासाठी मशान भूमीत पाण्याची आवश्यकता असते मात्र याच मशान भूमीत पाणी उपलब्ध नाही, तसेच रात्रींच्या दरम्यान मुत्यु झालेल्या मृतकाचा मृतदेह आणताना मशान भूमीत लाईटची व्यवस्था नसल्यामुळे अनेक अडचणी समोरे जावे लागत आहे, मशान भूमीच्या बाजूला मोठा नाला असल्यामुळे साप विचु या सारखे विषारी प्राणी असण्याची भीती नाकारता येत नाही , त्यामुळे स्मशानभूमीत साफसफाई व वाल कॅम्पाउटची आवश्यकता सुद्धा आहे, तसेच स्मशानभूमीतील टिनशछत सुद्धा खाक होत आहेत, त्यामुळे येथे मुतदेह आणणाऱ्या नागरिकांची गैरसोय होत आहे, मनुष्याची जी अंतिम वेळ असते त्याच ठिकाणी स्वर्गास गेलेल्या मनुष्याला श्रद्धांजली देण्यासाठी जमलेल्या नागरिकांना थोळावेळ सुद्धा व्यवस्थित रित्या मिळत नसल्याने गावकऱ्यांन मध्ये नाराजीचा सूर पाहण्यास मिळत आहे, या स्मशान भूमीच्या विकासा करीता ग्रामपंचायतने आवर्जून लक्ष देऊन स्मशानभूमीचे काम तात्काळ मार्गी लावावे अशी मागणी येथील रहिवासी करीत आहेत.
हिवरखेड गाडगेबाबा स्मशानभूमीत सुविधांचा अभाव लाईट व पाण्याची व्यवस्था नसल्यामुळे गैरसोय ग्रामपंचायतिने लक्ष देण्याची गरज...
हिवरखेड प्रतिनिधी :-अर्जुन खिरोडकार.
