मुस्लीम बांधवाच्या धार्मिक भावना दुखावल्या बदल वसीम रिझवी यांच्याविरोधात पोलिसात तक्रार..

जळगाव जा.प्रतिनिधी:-

मुस्लीम लोकांच्या घार्मीक भावना दुखावल्या बद्दल वसीम रिझवी यांच्याविरोधात पोलिसात तक्रार.दिनांक 15 मार्च रोजी जळगांव जामोद शहरातील रहीवासी असून सर्व लोक मुस्लीम धर्मीचे अनुयायी आहोत.ह्या सर्व नागरिकांनी वक्फ बोर्डाचे माजी अध्यक्ष वसिम रिजवी यांच्या विरोधात जळगांव जा.पोलिस स्टेशनला तक्रार दाखल केली. त्या तक्रारी चे कारण 
असे की, दि. 11/3/21 रोजी लखनौ,उत्तर प्रदेश येथे राहणारे शिया वक्फ बोर्डाचे पुर्व अध्यक्षा वसीम रिजवी, यानी मा. सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करून इस्लाम धर्माचे सर्वात पवित्र धर्मग्रथ कुराणमध्ये बदल करून त्याच्यात असलेले आयत मघून एकुण 26 आयत वगळण्यात यावी अशी मागणी केली आम्हाला आशा आहे की, सुप्रिम कोर्ट याची ही याचिका अॅडमिट न करत ते फेटाळुन लावतील, पण वसीम रिजवी यांनी याचिका दाखल केल्यानंतर माध्यमांना बोलताना कुराण व मुसलमानांचे सुरवातीचे तीन खालिफा विरुध्द अनेक खोटे व बिनबुडाचे आरोप लावले, मुख्यतः त्याने सांगितले की, कुराण हे आतंवाद ची शिकवण देतो व इस्लामचे सुरुवातीचे तीन खालिफा यांनी ताकतीचा प्रयोग करून इस्लामचा फैलाव केला. कुराणमुळे मुस्लीम युवक आतंकवादाकडे वळत आहे. वसीम रिजवी यांनी दिलेली मिडीया बाईट ही सर्वत्र पसरलेली आहे. व त्याचे बोलणे ऐकुण मुस्लीम धर्म माननाऱ्या लोकांच्या धार्मीक भावना दुखावल्या गेल्या आहेत व इतर धर्माचे लोकांमध्ये अशी चुकीची माहीती अपप्रचार केल्यामुळे मस्लीम धर्म व इस्लाम बाबत इतर समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचे काम वसीम रिजवीने केलेले आहे.तरी वसीम रिजवी विरूध्द भादवि कलम 195च आयटी अॅक्ट प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात यावा व त्याला कडक शासन करावे अशी विनंती तक्रारी द्वारे करण्यात आली. यावर समीर अहमद ,मो इरफान हुसैन,शेख गुलाब,जावेद खान पटेल, महेबुब शेख,सौ खालीद, उबेद जमदार, तारीक जलाल, शेख नईम ,सोहेल खान,मो अरबाज, इत्यादीच्या सह्या आहे.
 

Previous Post Next Post