जलंब रेल्वे क्रॉसिंग वरील उड्डाण पुलाचे काम प्रगतीपथावर गेट बंदची समस्या सुटणार...

बुलढाणा जिल्हा  प्रतिनिधी:-सुरज देशमुख.

जलंब गावाजवळ असलेल्या रेल्वे क्रॉसिंग वरील उड्डाण पुलाचे काम प्रगतीपथावर आहे. या उड्डाण पुलामुळे रेल्वे गेट बंद असतांना नागरिकांना आपली वाहनी उभी करून तासन्तास थांबावे लागत असे. मात्र आता ही समस्या  सुटणार असल्याने नागरिकांना दिलासा मिळणार आहे.  बुलडाणा जिल्ह्यातील  खामगाव जलंब ते  माटरगाव ,भेंडवळ चांगेफळ जळगाव जामोद मार्गे ते थेट मध्यप्रदेश मध्ये हा रस्ता जोडला जातो. या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहतुकीची वर्दळ असते. या रस्त्यावर जलंब गावाजवळ रेल्वे क्रॉसिंग आहे. हा मार्ग थेट मुंबई ते नागपूर मुख्य मार्ग असल्याने दिवसभरात या मार्गावर १०० पेक्षा जास्त रेल्वे गाड्या धावतात. इंग्रज कालीन हा रेल्वे मार्ग आहे.या मार्गावर प्रवाशी वाहने दिवसरात्र धावत असतात.जलंब गावाजवळ रेल्वे क्रॉसिंग करताना रेल्वे गाडी धावत असल्यास प्रवाशी वाहनांना रेल्वे गाडी जाईपर्यंत रेल्वे गेटजवळ थांबावे लागते. यामुळे नागरिकांना तासन्तास त्रास सहन करावा लागतो. नागरिकांची ही समस्या लक्षात घेता अखेर राज्य शासनाने या ठिकाणी उड्डाण पूलाच्या बांधकामास मंजुरी दिली आहे. सुमारे १३ कोटी रुपयांच्या जवळपास  तांत्रिक मंजुरी देण्यात आली असून बांधकाम करण्यास सुरुवात करण्यात आली आहे.या ठिकाणी पोच मार्गासह रेल्वे उडडाण पुलाचे बांधकाम करणे , लेव्हल क्रॉसींग , पोचमार्ग वळणरस्ता , संरक्षक भिंत यासह इतर कामांचा समावेश आहे.सदरहु काम सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीत असून आर. बी. घोडके कंट्रक्शन उड्डाण पुलाचे काम करीत आहे.सद्यस्थितीत सर्वीस रोड चे काम प्रगतीत असुन तसेच आरओबी च्या पाया खोदकामाचे काम प्रगतीत आहे . रेल्वे हद्दीतील पुलाच्या बांधकामाची कार्यवाही रेल्वे विभागामार्फत करण्यात आली आहे. या उड्डाण पुलामुळे  नागरिकांचा वेळ वाचण्यास मदत झाली आहे तर नागरिकांची कायमस्वरूपी समस्या निकाली लागली आहे.।  जलंब गावाजवळील रेल्वे क्रॉसिंग च्या उड्डाण पूल कामास सुरुवात झाली असून येत्या वर्षभरात रेल्वे पोचमार्गाचे काम पूर्ण होणार आहे.- प्रवीण पुंडकर, उपविभागीय अभियंता,सार्वजनिक बांधकाम विभाग खामगाव

Previous Post Next Post