एकझीरा सोनापुर डांबरीकरण रस्ता खिळखिळा रस्त्यांची स्थिती सुधारण्याऐवजी बिघडतेय....

अमरावती जिल्हा प्रतिनिधी:-राजु भास्करेे.

 तालुक्यातील एकझीरा सोनापुर गावांना जोडणारे रस्ते पुर्णपणे उखडले आहेत त्यामुळे तेथील स्थानिक लोकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे अनेक वर्षापासूनची परिस्थिती सुधारण्याऐवजी लाखो रुपये लावुन सुद्धा खराब होत आहे. एकझीरा ते सोनापुर व सोनापुर ते मोरगड रस्ता डांबरीकरण चे कामाचे टेन्डर लागले होते परंतु अधिकारी व पदाधिकारी यांच्या आर्शीवादाने ते कामे मॅनेज करून इस्टीमेट रेट ने संबधीत ठेकेदारा नि घेतले असुन हा रस्ता अत्यंत निक्रुष्ठ दर्जेचा बनने सुरु असुन या कडे मात्र सर्वा निच कानाडोळा केला आहे त्याच काही ठेकेदारानि या अगोदर सुद्धा कामे केलीत ते एका बर्षाच्या आत उखडले आहेत  जिल्हा परिषद बांधकाम विभाग ठेकेदाराच्या दावणीला बाधला असल्याचे नागरिक बोलत आहेत डांबर फक्त नावापुरतेच टाकल्याचे दिसते तीन कोट एवजी दोनच कोट मध्ये रस्त्यावर डांबर टाकून गुंडाळणे सुरु आहे क्रेशरची गिट्टी ऐवजी इकडूनच लाल मुरमाळ गिट्टी टाकणे सुरु आहेत काम लपविण्या करिता जेशि पि ने नाली खोदुन मातिने साईड बुजविने सुरु आहे रोडची जाडी ( थिकनेस) एकदम कमी असुन नियमाने हार्डमिक्स आवश्यक आहे पण कसेतरी लिपापोति करून सदर कामे सुरु असुन करोना मध्ये अधिकारी सुद्धा कामावर जात नसल्या चा फायदा सदर ठेकेदार घेत असुन कमीशन खोरीत एकाच वर्षात कामाची ऐसी तैसी होणार असल्याचे नागरिक बोलत असुन ठेकेदाराला नेत्यांचे आर्शिवाद असल्याचे समल्या जात आहे एकझीरा ते सोनापुर डांबरी रस्त्याची उच्चस्तरीय चौकशीची मागणी एकझीरा सोनापुर परिसरातील नागरिकांनी केली आहे. हा रस्ता चा कामे अतिशय खराब सुरु असुन रस्ता खिळखिळा झाला आहे डांबरी रस्त्यावर जागोजागी खड्डे सुध्दा पडले आहे नागरिकांची रहदारी कमी असतानाही रस्त्याचे तीनतेरा वाजले कसे असा सवाल आता नागरिकांकडून विचारला जात असुन संबंधित ठेकेदारावर कारवाई करण्याची होत आहे अनेक वर्षांपासून हीच दयनीय अवस्था सहन करीत येथील स्थानिक रस्ता होण्याची नुसती वाटच बघत आहेत त्यांची ही आशा कधी पुर्ण होणार ग्रामीण भागातील रस्ते म्हणजे प्रत्येक गावांच्या रक्तवाहिन्या होत परंतु याच रक्तवाहिन्या व्यवस्थित नसतील तर या गावांची दशा अत्यंत बिकट होते याचा अनुभव येथील रहिवाशांना नक्कीच येत असेल तर एकझीरा सोनापुर डांबरीकरण केलेल्या रस्त्यावर खड्डे व रस्ता खिळखिळा झाला आहे या रस्त्याचे काम निक्रुष्ठ दर्जाचे झाल्याचे यातुन दिसुन येत आहे. ग्रामीण भागात रस्त्यांचा प्रश्न गंभीर एकझीरा ते सोनापुर रस्त्याची समस्या एका वर्षातच डांबरीकर रस्ता उखडला जिल्हा परिषद बांधकाम विभाग तसेच संबंधित इतर विभागांनी याकडे विशेष लक्ष देऊनही कामे पुर्णत्वास नेणे आवश्यक आहे खराब रस्त्यांमुळे होणारे नुकसान लोकांना आता पडवणारे नाही सोनापुर एकझीरा येथील डांबरीकरण आता उखडायला लागले आहे हे काम ठेकेदाराने अतिशय निक्रुष्ठ दर्जाचे केल्याचे दिसुन येते डांबरीकरण झालेल्या कामाची चौकशी करुन ठेकेदारावर कारवाई करण्याची मागणी एकझीरा सोनापुर गावातील नागरिकांनी केली आहे .

Previous Post Next Post