जळगांव जा.प्रतिनिधी:-
दिनांक ८ मार्च रोजी जागतिक महिला दिनी वंचित बहुजन आघाडी चे राज्य उपाध्यक्ष आद,शरदभाऊ वसतकार, वंचित बहुजन आघाडी चे जिल्हा अध्यक्ष आद,गणेशभाऊ चौकसे, जिल्हा महासचिव आद,ॲड.ईखारे साहेब, हे जळगांव जामोद येथे आले असता समाजभूषण तथा जिल्हा नेत्या आद,पार्वताबाई मुकुंदराव इंगळे यांचे निवासस्थानी आले असता जागतिक महिला दिनानिमित्त मातोश्री जिजाऊ,माता अहिल्याबाई,माता सावित्रीबाई,माता रमाबाई यांच्या प्रतिमेचे हार टाकुन पुजन करण्यात आले तसेच महिला दिनाचे औचित्य साधून वंचित बहुजन आघाडी च्या नेत्या आद,पार्वताबाई इंगळे यांचाहि यावेळी पुष्पहार घालून सत्कार केला व महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या यावेळी वंचित बहुजन आघाडी चे जिल्हा उपाध्यक्ष शंकरराव इंगळे,युवा नेते विजय सोनोने, सुनिल बोदडे, मुकुंदराव इंगळे,मनिष पवार,स्वप्निल गवई सह इतर कार्यकर्ते हजर होते.