दिनांक आठ मार्च रोजी जिल्हा परिषद मराठी उच्च प्राथमिक शाळा सोनगाव येथे जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने ग्रामपंचायत नवनिर्वाचित महिला सदस्य तसेच दोन मुलींना सरकारी कर्मचारी बनविणाऱ्या गिताबाई गजानन दामधर अंगणवाडी सेविका यांच्या पतीच्या निधनानंतर त्यांनी दोन्ही मुलींना उत्तम शिक्षण देऊन अधिकारी पदावर पोचवल्याबद्दल त्यांचा सत्कार जामोद केंद्राचे केंद्रप्रमुख नितीन सातव यांच्या हस्ते तथा इतर कर्तबगार महिलांचा सत्कार मुख्याध्यापक ताडे सरांच्या हस्ते व शिक्षक वृंद यांच्या हस्ते पार पडला या प्रसंगी झाशीची राणी लक्ष्मीबाई राजमाता जिजाऊ अहिल्यादेवी होळकर क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले इंदिरा गांधी यांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले या प्रतिमांचे पूजन शाळा समिती अध्यक्षा सुनीताताई सोनटक्के तथा महिला मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले यावेळी कुमारी अस्मिता क्षिरसागर मॅडम यांनी या सर्व थोर विभूषित कर्तबगार स्त्रियांच्या जीवनावर प्रकाश टाकून मोलाचे विचार मांडले तथा या कार्यक्रमाचे सूत्रसंचालनही केले प्रसंगी कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून केंद्रप्रमुख नितीन सातव शाळेचे मुख्याध्यापक ताडे सर, अस्मिता क्षिरसागर,सौ उमाळे,कुमारी खर्डे,सारोकार सर,सहावे सर,गवई सर,बोंबटकार मँडम,राजगुरे मँडम, साबे मँडम, उर्दू शाळेचे शिक्षक शफिक सर शाळेचे शिपाई मनोहर वानखडे, ग्रामपंचायत सदस्य ज्योती पुरुषोत्तम ढगे, योगिता उमेश कुरवाडे,द्रोपदी पांडुरंग गवई, तसेच आपल्या स्वकर्तृत्वावर मुलींना पुढे नेणारी आई गीताबाई गजानन दामधर, अंगणवाडी सेविका सुनिता भड,पुष्पा सांगळे,चंदाबाई चिंचोलकार, वेणु वानखडे, सखुबाई येऊल यांच्यासह बहुसंख्य महिला सेविका उपस्थित होत्या. हा सर्व कार्यक्रम covid-19 चे पालन करीत संपन्न झाला.
जागतिक महिला दिन जिल्हा परिषद मराठी प्राथमिक शाळा सुनगाव येथे संपन्न..
जळगांव जा.प्रतिनिधी:-अनिल भगत.