महिलांच्या हितासाठी व त्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी राष्ट्रीय स्तरावर कार्यरत असलेल्या मातृशक्ती संघटने च्या विदर्भ प्रदेशाध्यक्षपदी शेगाव येथील सौ गीता ताई गोपाळराव वाघ यांची नियुक्ती करण्यात आली आहे मातृशक्ती संघटने च्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक राष्ट्रीय कोषाध्यक्ष सौ मुक्ताताई ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली व्यंकटेश नगर डाबेराव गल्ली शेगाव येथे नवीन पदाधिकाऱ्यांच्या नियुक्तीबाबत आयोजित करण्यात आली होती या बैठकीमध्ये शासनाने लागू केलेल्या नियमांचे काटेकोरपणे पालन करीत राष्ट्रीय अध्यक्ष वैशालीताई तायडे राष्ट्रीय उपाध्यक्ष सौ रुपाली वानखडे राष्ट्रीय सचिव डॉक्टर शबनम शेख राष्ट्रीय संघटक सौ लीनाताई भारंबे पाटील व राष्ट्रीय कोषाध्यक्ष मुक्ताताई ठाकूर यांच्या उपस्थिती मध्ये मातृशक्ती संघटनेचे कार्य विदर्भातील अकराही जिल्ह्यांमध्ये वाढविण्याच्या उद्देशाने सौ ंगीता वाघ यांच्या नावावर विदर्भ प्रदेशाध्यक्ष पदासाठी चर्चा करण्यात आली यावेळी सर्वांनी एकमताने त्यांच्या नावाला सहमती दर्शवून गीता ताई यांनी विदर्भ अध्यक्ष म्हणून मातृशक्ती संघटनेच्या कार्याला गती प्रदान करावी असे आवाहन मातृशक्ती संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष सौ वैशाली ताई तायडे यांनी केले या बैठकीला अलकाताई चंद मातृशक्ती संघटनेच्या बुलढाणा जिल्हा अध्यक्ष सौ रेखा प्रशांत शेळके माधुरी शर्मा कुमारी रक्षा भगवान भारंबे पाटील सौ पुनम शेळके कुंदवनी ताई काळे आदी महिला उपस्थित होत्या
मातृशक्ती संघटनेच्या विदर्भ प्रदेशाध्यक्षपदी शेगावच्या सौ गीता ताई वाघ....
शेगाव ता.प्रतिनिधी:-
