शेगाव ता.प्रतिनिधी:-
माळी समाजाच्या वतीने समाजात मधील कर्तुत्ववान युवक युवती महिला व पुरुषांचा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता .. त्रिशूल नवयुवक मंडळ तायडे परिवार संभाजी नवयुवक मंडळ कार्यशक्ती स्वयंसहायता बचत गट यांच्या संयुक्त विद्यमाने माळी समाजातील स्वतःच्या कर्तुत्वाने समाजात मानाचे स्थान प्रतिष्ठा प्राप्त करून देणाऱ्या समाज बांधव व महिला भगिनी यांचा हृदय सत्कार कोरोना प्रादुर्भाव लक्षात घेऊन कोरोना नियमांचे पालन कडेकोट पालन करून कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते उत्तमराव तायडे यांच्या अध्यक्षतेखाली वसंतराव तायडे पत्रकार किशोर दसोरे श्याम इंगळे यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये आयोजित करण्यात आलेल्या या सत्कार सोहळ्या मध्ये सर्वप्रथम संत गजानन महाराज संत सावता माळी महात्मा ज्योतिबा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात येऊन अभिवादन करण्यात आले या वेळी सदर राव भोपळे विद्यालय हिवरखेड येथून मुख्याध्यापक म्हणून सेवानिवृत्त झाल्याबद्दल राजेश विनायकराव तायडे आयुर्वेदिक वैद्यकीय महाविद्यालयात पदवी शिक्षण करिता निवड झाल्याबद्दल कुमारी मोनिका गोपाल तायडे महिला आघाडीच्या शेगाव तालुका उपाध्यक्ष पदी निवड झाल्याबद्दल वैशालीताई अरविंद तायडे याच प्रमाणे इंजिनीअरिंगची पदवी घेतलेल्या पंकज सुनील तायडे यांची एअरपोर्ट ऑथॉरिटी भावनगर गुजरात येथे मेकॅनिकल इंजिनिअर म्हणून तर शिवम घनश्याम तायडे यांची विदर्भ कोकण ग्रामीण बँक असिस्टंट मॅनेजर म्हणून निवड झाल्याबद्दल शाल श्रीफळ देऊन सर्वांचे हृदय सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले यावेळी सत्कार मूर्तींना भेटवस्तूसुद्धा देण्यात आल्या होत्या कार्यक्रमाला उत्तमराव तायडे राजेंद्र तायडे आनंद तायडे यांनी मार्गदर्शन केले पास्ताविक गोपाल तायडे तर सूत्रसंचालन ज्ञानेश्वर तायडे यांनी केले यावेळी सत्कार मूर्ती तर्फे पंकज आणि शिवम या दोन्ही युवकांनी आपण कशा प्रकारचे कष्ट सहन करून प्रतिकूल परिस्थितीमध्ये यश संपादन केले त्याबद्दल आपले अनुभव कथन केले या कार्यक्रमाच्या शेवटी समाज भूषण स्वर्गीय भारत भाऊ तायडे यांना दोन मिनिटं स्तब्ध उभे राहून सर्वांनी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली कार्यक्रमांसाठी योगीराज शेगाव इंटरपाईजेस पातुर्डा कार्यशक्ती स्वयंसहाय्यता बचत गट महिला बचत गट यांच्यासह ऋषिकेश तायडे तायडे गोपाल राजाराम तायडे जगन्नाथ तायडे आदींनी परिश्रम घेतले.
