वरणगाव मंजूर पाणी योजनेचे काम सुरू करा यासाठी महिला दिनाच्या दिवशी भाजपा च्या रणरागिणी उतरल्या रस्त्यावर नगरपरिषद मध्ये ठिय्या आंदोलन...

वरणगाव प्रतिनिधी -सुनील पाचपोळ 

एक महिन्याच्या आत मंजूर पाणी योजनेच्या कामाला सुरुवात करणार-मुख्यधिकारी श्री सौरभ जोशी 

महिलांच्या हाती सावित्रीबाई फुले रमाबाई आंबेडकर , राजमाता जिजाऊ बहिणाबाई चौधरी यांच्या प्रतिमा हाती होत्या तोंडाला मास्क व सामाजिक अंतर पाळून महिलांनी आपला रोष वेक्त केला.भाजपा सरकारने 23 सप्टेंबर 2019 रोजी वरणगाव शहरासाठी 24×7 अशी 25 कोटींची पाणी पुरवठा योजना मंजूर करून दिली   महाविकास आघाडी सरकारने दीड वर्ष स्थगिती दिल्याने आज पर्यंत जनतेच्या तोंडाचे पाणी लांबविले पाणी योजनेचे काम सुरू व्हावे यासाठी माजी नगराध्यक्ष सुनिल काळे यांनी औरंगाबाद उच्चन्याल्याय याचिका दाखल केली तसेच भाजपा ने रस्त्यावर उतरून रस्ता रोको उपोषण जलसमाधी आंदोलने केली त्याची दखल घेउन जिल्हाधिकारी यांनी वर्क ऑर्डर 22 जानेवारी ला दिली आज दोन महिने होत आहे तरी कामाला सुरुवात होत नाही म्हणून हंडा मोर्चाचे आयोजन केले मात्र मोर्चा ची परवानगी नाकारली त्या अनुषंगाने आज भाजपा महिला मोर्चाच्या वतीने नगरपरिषदेत ठिय्या आंदोलन केले यावेळी मुख्यधिकारी श्री सौरभ जोशी यांना मागण्यांचे निवेदन हंड्यावर लावून हंडा भेट दिला लवकरात लवकर भाजपा सरकारच्या काळात  मंजूर पाणी योजनेचे काम सुरू करा अन्यथा अजून महिला मोर्चा  महिलांचे आंदोलन त्रिव करणार असल्याचे यावेळी महिलांनी ठणकावून सांगितले यावेळी मंजूर 2 कोटी 72 लक्ष  रुपयांचे क्षेत्र नागेश्वर मंदिराचे काम सुरू करा , जगदंबानगर मकरंद नगर येथील बगीच्यांच्या कामाला सुरुवात करा भोगावती नदी शुशोभिकाराणा साठी 5 कोटी राखीव ठेवला आहे त्या कामाला सुरुवात करा पिसाळलेल्या कुत्र्यंचा तात्काळ बंदोबस्त करा सिद्देशवर व आकसा नगर येथील शौचालय सुरू करा करोना आजार पसरतो आहे तो आटोक्यात आणण्यासाठी फवारणी करा अश्या मागण्या केल्या यावेळी आज पासून  एक महिन्याच्या आत मंजूर पाणी योजनेच्या कामाला सुरुवात करण्याचे ठोस अश्वाशन मुख्यधिकारी श्री सौरभ जोशी यांनी आंदोलकार यांना दिले  यावेळी  भाजपा महिला मोर्चा शहराध्यक्ष सौ प्रणिता पाटिल चौधरी , माजी नगराध्यक्ष सुनील काळे उपनगराध्यक्ष शेख आखलाक भाजपा शहराध्यक्ष सुनील माळी शामराव धनगर जिल्हा उपाध्यक्ष श्री एड ए जी जंजाळे कृष्णा माळी संदीप माळी पप्पू ठाकरे मिलिंद भैसे गणेश चौधरी  महिला सौ रजनी भावसार सौ रूपाली काळे सौ संगीता सुनील माळी पूजा शामराव धनगर ता तायडे जयश्री अवतारे सौ उषा तावडे सौ संगीता माळी भाग्याश्री पाटील मंदा शेळके चंद्रकला वारूळकर वर्षा बढे रेखा तायडे विद्या तायडे रूपाली लोंढे बेबी माळी मंगला तेली प्रमिला बडगुजर तुळसाबाई वंजारी भारती माळी विमीक्षा बेन पटेल सुशीला महाजन  मंगला महाजन -यांच्या सह असंख्य महिला उपस्तिथ होत्या.

Previous Post Next Post