मोर्शी पंचायत समितीचे नवीन सभापती दयाराम काळे...


अमरावती जिल्हा प्रतिनिधी :-राजु भास्करे.

मेळघाटात अतिशय प्रशिध्द असलेले काँग्रेस नेता अमरावती जिल्हा परिषद समाज कल्याण सभापती दयाराम काळे यांचा कामकाज पाहून जिल्हा परिषद अमरावती अध्यक्ष बबलू भाऊ देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली आज दि. 8/3/2021 रोजी C. O. अमोल ऐडगे साहेब यांच्या कार्यालयात मोर्शी पंचायत समितीचे सभापती म्हणून बिनविरोध निवड करण्यात आली आहे.  ही निवड झाल्याबद्दल काँग्रेस कार्यकर्त्यांनी खुशी चा आनंद व्यक्त केला आहे. बोलल्या जात आहे कि जिल्हा परिषद समाज कल्याण सभापती दयाराम काळे हे मेळघाटातील आदिवासी बांधवांचे कामे एकदम जिद्दीने करीत आहे. तसेच मेळघाटातील जनतेचे कोणत्याही प्रकारचे कामे असले तर ति कामे  पुर्ण पणे मार्गि लावल्या शिवाय सोडत नाही. हे विशेष. अशाच कामाची पावती म्हणून आज दयाराम काळे यांची मोर्शी पंचायत समितीचे नवीन सभापती म्हणून निवड करण्यात आली आहे. या निवडीबद्दल मिश्रिलाल झारखंडे, सगणे सर, राजु भास्करे, ललीत नैकले, अक्षय उमप, दादा खडके, जगदीश ठाकरे, जहीर भाई, किशोर पाटील यांनी आभार मानले आहेत.

Previous Post Next Post