शासनाच्या कृषी वीज बिल धोरणाला जळगाव जामोद उपविभाग अंतर्गत येणाऱ्या ग्राहकांचा उस्फुर्त सहभाग...


 जळगांव जा.प्रतिनिधी:-

 शासनाच्या कृषी वीज बिल धोरण 2020 अंतर्गत जळगाव जामोद उपविभाग येथील श्री विजय घोपे (विज कर्मचारी तथा वर्कर्स फेडरेशन चे विभागीय सहसचिव)यांनी शेतीचे 20000 रुपये भरुन कृषी वीज बिल धोरणाचा फायदा घेतला.व तसेच भीमराव किसन घोपे यांनी  शेतीचे वीज बिल29470 रुपये दिलीप भीमराव घोपे यांनी शेतीचे वीज बिल 27020 रुपये भरून सदर योजनेचा लाभ घेतला.यावेळी श्री महेश कातखेडे( उपकार्यकारी अभियंता) जळगाव जामोद उपविभाग यांनी सदर वीज कर्मचारी श्री विजय घोपे व शेतकरी श्री भिमराव घोपे  व दिलीप घोपे यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला यावेळी श्री के एम होणे  सहाय्यक अभियंता श्री धर्मेंद्र तायडे सहाय्यक अभियंता व सुरेश विश्र्वेकर (सुरक्षा रक्षक )उपस्थित होत. यावेळी बोलताना कार्यकारी अभियंता श्री महेश कातखेडे यांनी विज बिल भरून सहकार्य करण्याचे व तसेच कृषी वीज बिल धोरण 2020 चा फायदा सर्व शेतकरी वर्गाने घ्यावा असे आव्हान केले

Previous Post Next Post