शेगाव - पंढरपूर रस्त्याच्या कामामध्ये प्रचंड प्रमाणात अनियमितता होत असल्याची तक्रार लोणार न.पा च्या नगराध्यक्ष पूनम मनीष पाटोळे यांनी बुलढाणा जिल्ह्याचे पालक मंत्री डॉ राजेंद्र शिंगणे तथा सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांच्या कडे एका निवेदनाद्वारे दिली आहे निवेदनात नमूद प्रमाणे लोणार शहरातून जाणाऱ्या महामार्गा मध्ये संबधित विभागाने शहरातील दत्त मंदिरा पासून मंठा नाक्या पर्यंत डांबरी रस्ता बनवला त्याच्या दोन्ही बाजूने नाल्या बांधने आवश्यक आहे तसेच शहरातील रस्त्याच्या बाजूच्या नाल्या मुख्य लाईन सोबत जोडाव्या शहरातून जाणाऱ्या रस्त्याच्या बाजूने बांधण्यात येत असलेल्या नाल्या काही ठिकाणी पाईप लाईन वर बांधण्यात येत आहे सदर पाईप लाईन स्थलांतरित करणे आवश्यक आहे जो पर्यंत पाईप लाईन स्थलांतरित होणार नाही तो पर्यंत नालीचे बांधकाम करू नये व त्या साठी खर्चाची पूर्तता करण्यात यावी शहरातून जाणाऱ्या रस्त्याच्या बाजूला मुरूम टाकून भरने आवश्यक आहे मुरूम न टाकल्यामुळे मागील काही दिवसा आगोदर रेतीचा ट्रक पलटी झाला होता या अपघातात संबधित विभाग जवाबदार आहे सदर रस्त्याच्या बाजूला मुरूम त्वरित भरण्यात यावा शहरातील विद्युत पोल स्थलांतर करण्याची जवाबदारी संबधित विभागाची असताना काही विद्युत पोल स्थलांतरीत केले त्या वर या पूर्वी लोणार न.प कडून लाईट लावण्यात आले होते मात्र संबधित ठेकेदाराने सदर लाईटे काढले व हरविले सर्व इलेक्ट्रिक पोल योग्य त्या ठिकाणी स्थलांतरीत करून त्या वर लाईट लावून द्यावे शेगाव पंढरपूर राष्ट्रीय महामार्गाच्या रस्त्याच्या कामा मध्ये अनेक ठिकाणी अनियामिता व त्रुटी आढळून आली आहे या मागण्या लवकरात लवकर निकाली काढण्यात याव्या अन्यथा लोकशाही मार्गाने जन आंदोलन करण्यात येईल व याची सर्व जवाबदारी संबधित विभागाची राहील असा इशारा नगराध्यक्ष पूनम मनीष पाटोळे यांनी दिला आहे.
शेगाव - पंढरपूर राष्ट्रीय महामार्गाच्या कामात अनियमितता.नगराध्यक्ष पूनम पाटोळे यांची पालकमंत्री व सा.बा मंत्री यांच्या कडे तक्रार...
लोणार प्रतिनिधी:-संदीप मापारी पाटील.
