फलटण ग्रामिण पोलीस यांची दमदार कामगिरी स्वराज साखर कारखाना उपळवे येथील स्टोअर रूम मधील चोरीस गेलेला मुददेमाल सह आरोपी ४८ तासात हस्तगत...


 फलटण ता.प्रतिनिधी: - गोविंद मोरे.

उपळवे ता.फलटण येथील स्वराज इंडिया अॅग्रो साखर कारखाना उपळवे येधील कारखान्यातील स्टोअर रूम मधील ३,१४,७५२ / -रूपये किमतीचा मुद्देमाल स्टोअर रूम मधुन मालकाच्या समती शिवाय चोरून नेहले बाबत फिर्यादी अनिलकुमार पाडुरंग लावरे वय ३८ वर्षे व्यवसाय नोकरी ( स्वराज साखर कारखाना उपळवे ) रा.सांगवी ता बारामती जि पुणे यांनी तक्रार दिलेने फलटण ग्रामीण पोलीस ठाणे गुन्हा रजि.नं. ११/२०२१ आय.पी.सी.कलम .३८१,३४ प्रमाणे दाखल करणेत आला होता सदर गुन्हा उघड करणेसाठी मा.उपविभागीय पोलीस अधिकारी श्री.तानाजी बरडे  फलटण भाग फलटण यांनी सुचना दिलेल्या होत्या त्या प्रमाणे मा.उपविभागीय पोलीस अधिकारी श्री.तानाजी बरडे.फलटण भाग फलटण व पोलीस निरीक्षक सावंत यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक यु.एस.शेख यांनी गुन्हयाचा तपास तांत्रीक कौशल्याने करून व गोपीनीय बातमीदार यांचेकडुन मिळालेले माहितीवरून सदर गुन्हयातील संशयीत आरोपी १ ) विक्रम गणेश जगदाळे वय २३ वर्षे रा.सावंतवाडी ता. फलटण जि.सातारा २ ) शशिकांत विष्णु कदम वय -३० वर्ष रा . दर्‍याचीवाडी ता . फलटण ३ ) अक्षय रामचंद्र जाधव वय -२३ वर्षे रा , श्रीरामनगर उपळवे ता फलटण जि . सातारा ४ ) अमोल आरविंद शिंदे वय -४२ वर्षे रा . शिंदेवाडी ता.फलटण जि.सातारा यांना ताब्यात घेवुन त्यांना विश्वासात घेवुन प्रश्न कौशल्य वापरून सदर गुन्हयाचे अनुशंगाने चौकशी केली असता सदर आरोपीने गुन्हा केलेची कबुली दिली असुन त्यांचेकडुन गुन्हयातील चोरीस गेलेला एकुण ३,१४,७५२ / रूपये किंमतीचा मुददेमाल सदर आरोपी यांचेकडुन हस्तगत केला  आहे. सदर गुन्हयाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक शेख हे करीत आहेत . सदरची कामगिरी ही मा.पोलीस अधिक्षक श्री अजयकुमार बन्सल . अप्पर पो अधिक्षक धीरज पाटील  . उपविभागीय पोलीस अधिकारी तानाजी बरडे .फलटण भाग फलटण व पोलीस निरीक्षक सावंत.यांचे मार्गदर्शनाखाली सहा.पोलीस निरीक्षक बोंबले , पोलीस उपनिरीक्षक शेख , पो हवा ३१६ हांगे.पो.ना .६८५ तुप.पो.का २४६६ जगदाळे पो.कॉ .२५०१ अवघडे , पो.का २३ ९ ४ कुंभार , पो.ना .१४५ ९ देवकर , पो.ना .६६१ काशिद , पो को १ ९ ५१ पाटोळे व पो.का २५३० गायकवाड यांनी केली आहे .

Previous Post Next Post