व्यावसायिकांसाठी कोरोना तपासणी शिबिराचे नगर पालिका प्रशासनाकडून आयोजन..


 शेगाव ता.प्रतिनिधी:-

शेगाव येथील टाऊन हॉल मध्ये शेगाव शहरातील व्यावसायिक व दुकानदारांसाठी कोरोना टेस्टिंग शिबिराचे आयोजन करण्यात आलेले आहे.. जिल्हाधिकारी यांच्या आदेशान्वये शेगाव नगरपालिका क्षेत्रातील सर्व दुकानदार व्यवसायिकांना 17 मार्च पर्यंत कोरोना टेस्टिंग प्रमाणपत्र सादर करणे गरजेचे आहे अन्यथा पाच हजार रुपये प्रत्येकी दंड व दुकानाला सील लावण्याचा इशारा नगरपालिकेच्या वतीने शहरात भोंगा फिरवून शहरातील व्यवसायिक व दुकानदारांना देण्यात आला होता आज 16 मार्च मंगळवारी छत्रपती शिवाजी महाराज चौकाजवळील टाऊन हॉल येथे कोरोना टेस्टिंग शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे पहिल्या दिवशी 390 दुकानदारांनी आपापली तपासणी करून घेतली यामध्ये जवळपास 16 जण पॉझिटिव आल्याची माहिती मिळाली आहे या शिबिरात शहरातील खाजगी डॉक्टर बानोले डॉक्टर चौधरी यांनी व्यवसायिक व दुकानदार यांची कोरोना तपासणी केली यावेळी नितीन घरडे व इतरांनी सहकार्य केले.

Previous Post Next Post